शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

 गारपीटग्रस्तांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या अन्यथा आंदोलन – रविकांत तुपकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 16:47 IST

दिनांक 10 व 11 फेब्रुवारी रोजी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील रब्बी पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी किमान 50 हजार रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा...

मुंबई - दिनांक 10 व 11 फेब्रुवारी रोजी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील रब्बी पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी किमान 50 हजार रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाव्दारे दिला.    जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे की, 10 व 11 फेब्रुवारी रोजी विदर्भ-मराठवाड्यात राज्यात अचानक वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा, गहु, हरभरा, तुर, भाजीपाला व द्राक्ष बागांना मोठ्या फटका बसला. शेतकऱ्यांची ही पीके अक्षरश: जमीनदोस्त झाली. आधिच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर अचानक आलेल्या या आस्मानी संकटामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे.   बुलडाणा जिल्ह्यातील 356 गावांना या गारपिटीचा फटका बसला. तर वीज पडुन एकाच मृत्यु झाला. राज्यातील हजारो हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. बोंडअळीचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. सोयाबीनला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत असतांना अचानक झालेल्या या गारपीटीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात सरकारने कपाशीवर पडलेल्या बोंडअळीच्या नुकसानीची भरपाई देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही हे अनुदान शेकतऱ्यांना मिळाले नाही. सरकारच्या या घोषणेवर आता आमचा विश्वास नाही. राज्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने अनुदान जमा करावे.   छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. छत्रपती शिवरांच्या काळात शेतकऱ्यांनी कधीच आत्महत्या केल्या नाहीत. मात्र छत्रपतींचे नांव घेवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांची थट्टा सुरु केली आहे. राज्यात अचानक झालेल्या या गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र