शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गुटखा, सुगंधित सुपारीवरील बंदीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 2:50 AM

वाहतुकीवरदेखील घातले निर्बंध; ३५ टक्के नागरिक करतात तंबाखुचे सेवन

पुणे : गुटखा, सुगंधित तंबाखू आणि सुपारीवरील बंदीची मुदत आणखी एक वर्षाने वाढविण्याचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) घेतला आहे. या निर्णयात वाहतुकीवर देखील बंदी घातल्याने, बंदी घातलेल्या पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांनादेखील जरब बसणार आहे.राज्य सरकारने २०१२ मध्ये राज्यात गुटखाबंदी लागू केली. त्याच्या पुढच्याच वर्षी (२०१३) सुगंधित आणि स्वादिष्ट सुपारीवर देखील बंदीचा सरकारने निर्णय घेतला. एफडीएच्या अधिकारात दर वर्षी या पदार्थांवरील बंदीचा कालावधी वर्षभराने वाढविण्यात येत आहे.या बंदीचा कालावधी संपल्याने शुक्रवारी (दि. २०) बंदी कालावधी वाढविल्याचा अध्यादेश सरकारने काढला. त्यामुळे गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट-सुगंधित तंबाखू, मिश्रणयुक्त तंबाखू, खर्रा, मावा अशा एकत्र अथवा वेगवेगळ्या पुडीत अथवा कोणत्याही स्वरूपात विकण्यास प्रतिबंध घातला आहे. या पदार्थांची निर्मिती, साठवण, वितरण, विक्री आणि वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. पूर्वीच्या आदेशात वाहतुकीवरील बंदीचा समावेश नव्हता. परिणामी, अनेकदा न्यायालयीन प्रक्रियेत अडचणी उद्भवत होत्या. त्यामुळे वाहतुकीवरदेखील बंदी घालण्यात आली आहे. अवैधरीत्या प्रतिबंधित वस्तूंची वाहतूक करणाºयांवर अधिक वचक बसेल.घातक मॅग्नेशियम कार्बोनेटचे घटक : अनेक आजारांना निमंत्रणगुटखा, पानमसाला, तंबाखू आणि सुपारीमुळे हायपर मॅग्नेशिया, हृदयरोग, तोंडाचा कर्करोग, ल्युक्योप्ल्याकिया, अन्ननलिकेचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, प्रजननस्वास्थ्य, जठर, आतडे व श्वसनाचे आजार होतात. एफडीएमार्फत ११५३ नमुन्यांची चाचणी केली असता, त्यात घातक अशा मॅग्नेशियम कार्बोनेटचे घटक आढळून आले होते.टाटा रुग्णालयासह विविध संस्थांनीदेखील गुटखा, पानमसाला आणि सुपारीच्या घातकतेवर शिक्कामोर्तब केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुटखा, तंबाखू आणि सुगंधित सुपारीवर बंदी घातली होती.ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्व्हे आॅफ इंडिया यांनी २००९-२०१० मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ३५ टक्के व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे तंबाखू सेवन करीत असल्याचे आढळून आले होते.राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेच्या अहवालात १६ कोटींपेक्षा अधिक लोक धूम्रविरहित तंबाखूचा वापर करतात, असे अध्यादेशात म्हटले आहे.

टॅग्स :FDAएफडीएMaharashtraमहाराष्ट्र