शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला कोणी गुरूजी देतय का...गुरूजी !

By admin | Updated: July 19, 2016 20:52 IST

आम्हांला गुरुजी द्या हो . . . .असा टाहो फोडत गुरूपोर्णिमेच्या दिवशीच विद्यार्थ्यांनी थेट गटशिक्षण अधिकाऱ्याच्या दालळनात मंगळवारी शाळा भरवली.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. 19 -  आम्हांला गुरुजी द्या हो . . . .असा टाहो फोडत गुरूपोर्णिमेच्या दिवशीच विद्यार्थ्यांनी थेट गटशिक्षण अधिकाऱ्याच्या दालळनात  मंगळवारी शाळा भरवली.  पाटोदा तालुक्यातील बांगरवाडी येथील विद्यार्थी गट शिक्षण अधिकारी कार्यालयात पोचले. यावेळी केवळ चार कर्मचारी कार्यालयात होते.  तहसीलदारांनी कार्यालयाचा पंचनामा केला .शहरापासून ३ कि.मी. अंतरावर बांगरवाडी हे गाव आहे. नगर पंचायत कक्षेत असणाऱ्या या गावात चौथीपर्यंत शाळा असून, २९ विध्यार्थी प्रवेशित आहेत. शाळेसाठी एस. व्ही. झांजुर्ने आणि यू.जे. गोरे या दोन शिक्षिकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. झांजुर्ने तीन आठवड्यापासून शाळेत उपस्थित नाही तर गोरे याही सुटीवर गेल्याने मंगळवारी शाळेत शिक्षकच नव्हते. बांगरवाडी येथील पालकांनी यापूर्वी अनेकवेळा तक्र ारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे चिडलेल्या पालकांनी विद्यार्थी घेऊन थेट गट शिक्षण अधिकारी कार्यालय गाठलेपालक बंडू काळे, नगर पंचायतचे शिक्षण सभापती सूरज कांकरिया, नगरसेवक राजू जाधव, शंकर काळे, रामभाऊ तांबारे, कचरु  काळे, बळीराम सस्ते, विठ्ठल काळे, रामभाऊ काळे, महादेव भिसे, भागवत काळे, मनोज अर्सुळ, दत्ता जाधव, कृष्णा तांबारे, राहुल काळे यांनी विद्यार्थ्यांसह ठिय्या दिला.  कार्यालयात केवळ एस. बी. सपकाळ, एस. जी. धोंडे हे कनिष्ठ सहायक व दोन परिचर उपस्थित होते.दरम्यान पंचनामा सुरू असताना गट शिक्षण अधिकारी  कार्यालयात दाखल झाले. शाळेसाठी कोठूळे या शिक्षकाची  नियुक्ती केली आणि वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. गट शिक्षण अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने सर्वच शाळांचे नुकसान झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. ऐन गुरू पोर्णिमेच्या दिवशीच दिवशी विद्यार्थ्यांना गुरूंची मागणी करावी लागली. तहसीलदार मुकेश कांबळे यांनी नायब तहसीलदार एस. व्ही. ढाकणे यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पंचनामा होईपर्यंत काही ह्यदांड्याबहाद्दूरह्ण कर्मचाऱ्यांनी हजेरीपटावर सह्या करून तहसील प्रशासनाच्या डोळ्यातही धूळफेक केली असल्याचे समोर आले.