शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: मराठा आरक्षण म्हणजे अल्ट्रा व्हायर्स; गुणरत्न सदावर्तेंकडून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 13:39 IST

Maratha Reservation: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध होत असताना, अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

ठळक मुद्देमराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीमराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दगुणरत्न सदावर्तेंकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

मुंबई: राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्याय मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानेमराठा आरक्षण रद्द केले आहे. तसेच राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. यावर आता अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध होत असताना, अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या निर्णयाचे स्वागत केले. (gunratan sadavarte welcomed supreme court decision on maratha reservation)

मराठा आरक्षणासंदर्भात न्या. अशोक भूषण, न्या. नागेश्वर राव, न्या. एस. अब्दुल नाझीर, न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. रवींद्र भट यांच्या खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करत असल्याचा निकाल दिला. भारतीय संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाने गुणवंतांना न्याय दिला आहे, अशी प्रतिक्रिया वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. 

मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

इंदिरा साहनी खटल्याच्या अनुषंगाने फेरविचार करण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अल्ट्रा व्हायर्स (घटनाबाह्य) म्हटलं आहे.  महाराष्ट्रातील खुल्या वर्गातील गणवंतांनी ज्या प्रकारे माझे, माझ्या कुटुंबाचे समर्थन केले. माझ्यामागे उभे राहिले. त्यांना शुभेच्छा देतो, असे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाचे ५२ मोर्चे झाले. त्यासाठी BMW मधून गर्दी जमवली. देवेंद्र फडणवीस यांना वेठीस धरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर दबाव आणला, असा दावा गुणरत्ने यांनी यावेळी केला.

आता काहीतरी मार्ग काढणे गरजेचे

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगितीचा निर्णय दिला. निकाल हा निकाल आहे, पण मराठा समाजासाठी हे दुर्दैव आहे. माझा लढा गरीब मराठा घटकांसाठी होता. पण निकाल मान्य करावा लागतो, असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे. 

दरम्यान, १९९२ मध्ये इंद्रा सहाणी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के आरक्षण मर्यादा घालून दिली होती. नऊ सदस्यीय खंडपीठाने मराठा आरक्षणावर निकाल दिला होता. त्यामुळे मराठा आरक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आले होते. या याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाली झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. बुधवारी निर्णय देताना, गायकवाड समितीचा अहवाल अस्वीकारार्ह असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मराठा आरक्षण देणे गरजेचे वाटत नसून, सध्याच्या परिस्थितीत आरक्षण देणे शक्य नाही, असे न्यायालयाने यावेळी नमूद केले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय