Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंनी अल्पवयीन मुलीच्या हाती दिले फॉर्च्युनरचे स्टेअरिंग; बारामतीकराने पोस्ट केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 19:47 IST2022-04-17T19:45:33+5:302022-04-17T19:47:37+5:30
Gunaratna Sadavarte's Video Viral: गुणरत्न सदावर्ते पॅसेंजर सीटवर बसले आहेत आणि त्यांची अल्पवयीन मुलगी झेन सदावर्ते गाडी चालविताना दिसत आहे. सदावर्ते हे मुलीचा कार चालवितानाचा व्हिडीओ काढत आहेत.

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंनी अल्पवयीन मुलीच्या हाती दिले फॉर्च्युनरचे स्टेअरिंग; बारामतीकराने पोस्ट केला व्हिडीओ
वकील गुणरत्न सदावर्ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. एसटी संप आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी राज्यभरात ठिकठिकाणी गुन्हे दाखल होत असून सध्या त्यांचा मुक्काम सातारा जेलमध्ये आहे. असे असताना बारामतीतून आता त्यांच्या अल्पवयीन मुलीचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये ती हायवेवर कार चालविताना दिसत आहे. सदावर्ते आणि कारच्या मालक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या व्हिडीओमध्ये गुणरत्न सदावर्ते पॅसेंजर सीटवर बसले आहेत आणि त्यांची अल्पवयीन मुलगी झेन सदावर्ते गाडी चालविताना दिसत आहे. तिचे वय सध्या १४-१५ वर्षांच्या आसपास आहे. गुणरत्न सदावर्ते हे मुलीचा कार चालवितानाचा व्हिडीओ काढत आहेत. या व्हिडीओमध्ये सदावर्ते म्हणत आहेत की, माझी मुलगी झेन ठाणे ते दादर हायवेवर पहिल्यांदाच फॉर्च्युनर ही गाडी चालवत आहे.... यानंतर ते गाडीचा नंबर काय आहे हे सांगत आहेत.
आपल्या अल्पवयीन१२वर्षाच्या मुलीला लायसन्स नसतानाही हायवेवर गाडी चालवण्यास देवुन इतरांचे जीवीतास धोका निर्माण करणार्या गुणरत्न सदावर्ते व गाडीमालक जयश्री पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा-नितीन यादव,बारामती @DGPMaharashtra@ThaneCityPolice@puneruralpolice@Dwalsepatilpic.twitter.com/dCeyZKQOhT
— Nitin Yadav (@nitin_s_yadav) April 16, 2022
यावर बारामतीच्या एका व्यक्तीने व्हिडीओ पोस्ट करत महाराष्ट्र, ठाणे पोलिसांसह गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनाही टॅग केले आहे. ''आपल्या अल्पवयीन १२ वर्षांच्या मुलीला लायसन्स नसतानाही हायवेवर गाडी चालवण्यास देऊन इतरांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते व गाडीमालक जयश्री पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.