शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातचे पाणी मुंबईला!

By admin | Updated: March 13, 2015 05:48 IST

दमण गंगा-पिंजाळ खोऱ्यातले ७५ टक्के पाणी महाराष्ट्राला मिळणार आहे, ते सगळे पाणी मुंबईला दिले जाईल. ज्यामुळे मुंबईचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल

मुंबई : दमण गंगा-पिंजाळ खोऱ्यातले ७५ टक्के पाणी महाराष्ट्राला मिळणार आहे, ते सगळे पाणी मुंबईला दिले जाईल. ज्यामुळे मुंबईचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल आणि वैतरणाचे पाणी गोदावरीत नेले जाईल, असे सांगून महाराष्ट्राच्या वाट्याचे थेंबभरही पाणी अन्य कोणाला दिले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी मुंबईसह राज्यातले अनेक विषय मांडले. दुष्काळ आणि अवकाळी पाऊस, गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे आणि सरकारपुढचे संकट संपलेले नाही, येत्या १३ आणि १४ तारखेला पुन्हा काही भागांत गारपिटीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविलेली आहे. त्यामुळेच सरकारने पॅकेज घोषित केलेले नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले. तब्बल दोन तास केलेल्या भाषणात त्यांनी नागपूर अधिवेशनात केलेल्या भाषणाचीच  पुनर्रावृत्ती केली. ठिबक सिंचनाचे पैसे तीन वर्षे आघाडी सराकरने दिले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्याची शासनाची मानसिकता आहे असे सांगून त्यासाठी तीन बैठका झाल्याचे ते म्हणाले. टोल नाक्याच्या करारात बाय बॅक नाही मुंबई -पुणे व मुंबई एन्ट्री पॉर्इंट या बड्या टोल नाक्यांचे करार करताना आघाडी सरकारने बाय बॅकचा मुद्दाच करार करतेवेळी टाकला नाही. त्यामुळे हे करार रद्द करता येत नाहीत, तरीही आम्ही वेळ पडल्यास कोर्टात जाऊ, पण टोलमुक्त करण्याची आमची भूमिका कायम ठेवू असेही मुख्यमंत्री म्हणाले. टोल करार करताना राज्याला १५ टक्के वाहनांवर पासेस देण्याचा अधिकार आहे. प्रत्यक्षात ही सूट घेणारी एकच टक्का वाहने आहेत. उर्वरित १४ टक्के सूट थेट ठेकेदारांना करार करुन दिली गेल्याचा गौप्यस्फोटही मुख्यमंत्र्यांनी केला.(विशेष प्रतिनिधी)