शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

राष्ट्रवादीविरोधात सेनेत खदखद; अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर मुख्यमंत्र्यांकडे तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 07:24 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधी मागणीसाठी कोणतीही फाईल गेली तर तिच्यावर ते नकारात्मक शेरा मारतात. त्यांना विचारायला गेल्यास टाळाटाळ करतात.

अतुल कुलकर्णी -मुंबई : निधीवाटपात अन्याय झाल्याची भावना काँग्रेस पक्षाने वारंवार बोलून दाखवली असताना आता दस्तुरखुद्द शिवसेनेच्या मंत्री आणि नेत्यांनीही अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तीव्र संताप व्यक्त करत अनेक तक्रारी केल्या. अजित पवारशिवसेना आमदारांच्या मतदारसंघात पराभूत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निधी देत असल्याची तक्रारही मुख्यमंत्र्यांकडे मांडली. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीचे चित्र बघायला मिळत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधी मागणीसाठी कोणतीही फाईल गेली तर तिच्यावर ते नकारात्मक शेरा मारतात. त्यांना विचारायला गेल्यास टाळाटाळ करतात. योग्य उत्तरे देत नाहीत, अशी भावना मंत्र्यांनी व्यक्त केली. अनेकदा शिवसेनेच्या आमदारांना मिळणारी वागणूकदेखील चांगली नसते. निधी देताना उपकाराची भावना असते. हा सर्व प्रकार आपण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सांगावा, असेही मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले.शुक्रवारी रात्री शिवसेनेच्या काही निवडक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि राष्ट्रवादी विरोधातील तक्रारींचा पाढा वाचला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादा भुसे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्री यावेळी उपस्थित होते. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षवाढीच्या नावाखाली शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या. शिवसेना आमदार असलेल्या मतदारसंघात २०१९ मध्ये जेथे राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले तिथे अजित पवारांकडून विद्यमान आमदारांना डावलून राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांना निधी दिला जात आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांनी कोणाकडे हा विषय मांडायचा, असा थेट सवालही ठाकरे यांना केला. शिवाय राष्ट्रवादीच्या आमदारांना अधिक निधी दिला जातो. त्यामुळे शिवसेनेचे आमदार सत्ता असूनही मागे पडत आहेत, अशीही नाराजी नेत्यांनी व्यक्त केली. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या डोक्यावर बसण्याचे काम राष्ट्रवादी करते आहे. त्यामुळे पक्षविस्ताराच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवत आहे, असा गंभीर आक्षेपही नेत्यांनी घेतला. 

नियोजनाच्या नावाखाली निधीला कात्री अर्थ खात्याचा शिवसेनेच्या विविध मंत्र्यांच्या विभागात अनावश्यक हस्तक्षेप वाढलेला आहे. आर्थिक नियोजनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधीला कात्री लावत असल्याची भावना मंत्र्यांनी बोलून दाखवली. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून शिवसेना आमदार आणि मंत्री यांची नाराजी दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

- अजित पवार यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचताना शिवसेनेच्या मंत्र्यांच्या निधीला कात्री लावली जात आहे. राष्ट्रवादीचे पालकमंत्री शिवसैनिकांची कामे करत नाहीत.- राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना निधीची खैरात झाली असून, तब्बल ४९ टक्के निधी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या विभागांना देण्यात आल्याची तक्रार सेना नेत्यांनी केली आहे. शिवसेनेच्या वाट्याला अवघा १९ टक्के निधी आल्याचेही मंत्र्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार