शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना कांदा अनुदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 18:50 IST

राज्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने कांद्याचे बाजार चांगलेच पडले.

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातील १२ हजार २२५ शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम नाशिक ७१ हजार, अहमदनगर ४८ हजार शेतकऱ्यांना फायदा

पुणे : कांद्याचे बाजार पडलेल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये प्रमाणे अनुदान देण्याचे राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आत्तापर्यंत राज्यातील १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक ७१ हजार ४३८ तर अहमदनगर जिल्ह्यातील ४८ हजार ९११ आणि पुणे जिल्ह्यातील १२ हजार २२५ शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला आहे. राज्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने कांद्याचे बाजार चांगलेच पडले. त्यामुळे राज्य शासनाने १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत कांद्याचे बाजार पडल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना २०० क्विंटल मर्यादेपर्यंत प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. प्रथमत: ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक शेतकऱ्यांना अर्ज करण्यास विलंब झाल्याने ही मुदत १५ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली. त्यातील ३१ डिसेंबरपर्यंत प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम देण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी करून त्यांच्याही बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. राज्यातील सात विभागातील १८ जिल्ह्यामधील ७७  कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये १ लाख ७४ हजार शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केले होते.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लेखापरीक्षक अधिकाऱ्यांनी छाननी केली. त्यानंतर तालुका स्तरावरील समिती १ लाख ६० हजार ६९८ शेतकरी पात्र ठरविले आहेत. या शेतकऱ्यांनी ५७ लाख ४० हजार ११७ कांद्याची विक्री केली असून त्यांना ११४ कोटी ८० लाख २३ हजार ४३६ रुपये अनुदान देण्यात आले आहे.जिल्हानिहाय कांदा अनुदानास पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी :- नाशिक- ७१,४३८,  धुळे-३६३६, जळगाव-१,२२३,अहमदनगर-४८,९११ , पुणे-१२,२२५, सोलापूर-८,८८३ ,कोल्हापूर-४,०५३ , सांगली-७२२ ,सातारा-१,३१७,औरंगाबाद-२,८७६, जालना-१२ , अमरावती-२३, अकोला-२६३,बुलढाणा-३६१, लातूर-३१६, उस्मानाबाद-६०८, बीड-३,७६१, नागपूर-०.

टॅग्स :PuneपुणेonionकांदाFarmerशेतकरीGovernmentसरकार