आज ग्रामपंचायत निवडणूक निकाल, मतमोजणीसाठीची सर्व तयारी पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 06:58 IST2021-01-18T01:02:15+5:302021-01-18T06:58:49+5:30
१५ जानेवारी रोजी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा ११ डिसेंबर २०२० रोजी करण्यात आली होती.

आज ग्रामपंचायत निवडणूक निकाल, मतमोजणीसाठीची सर्व तयारी पूर्ण
मुंबई : राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी लागणार असून गावचे कारभारी कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मतमोजणीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून २ लाख १४ हजार ८८० उमेदवारांचे भवितव्य निश्चित होणार आहे, तर २६ हजार ७१८ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.
१५ जानेवारी रोजी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा ११ डिसेंबर २०२० रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. तर गडचिरोलीतील सहा तालुक्यांतील १६२ ग्रामपंचायतींसाठी २० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. उर्वरित १२ हजार ७११ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर होणार आहेत.