जीपीएस ठरविणार प्री-पेड रिक्षाचे भाडे : आरटीओचा प्रस्ताव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 07:00 IST2018-10-26T07:00:00+5:302018-10-26T07:00:00+5:30

बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांची रिक्षा चालकांकडून होणारी लुट थांबविण्यासाठी पुन्हा प्री-प्रेड रिक्षा सेवेला संजीवनी मिळणार आहे.

GPS Pre-paid system for Rickshaw fares: Proposal of RTO | जीपीएस ठरविणार प्री-पेड रिक्षाचे भाडे : आरटीओचा प्रस्ताव 

जीपीएस ठरविणार प्री-पेड रिक्षाचे भाडे : आरटीओचा प्रस्ताव 

ठळक मुद्देप्री-पेडला पुन्हा मिळणार संजीवनीरिक्षांचे भाडे ठरविण्यासाठी पहिल्यांदाच जीपीएस यंत्रणेचा वापर केला जाणारशहरात एसटी, खासगी बस, रेल्वे, विमानाने शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी अनेकदा काही रिक्षाचालक संबंधित प्रवाशांकडून घेतात जादा भाडे वजन मापे विभागाकडून मार्गदर्शन घेतले जाणार

राजानंद मोरे
पुणे : बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांची रिक्षा चालकांकडून होणारी लुट थांबविण्यासाठी पुन्हा प्री-प्रेड रिक्षा सेवेला संजीवनी मिळणार आहे. या रिक्षांचे भाडे ठरविण्यासाठी पहिल्यांदाच जीपीएस यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. या यंत्रणेद्वारे प्रवाशाचे जाण्याच्या ठिकाणापर्यंतचे अंतर मोजून त्यानुसार भाडे आकारले जाईल. याबाबतचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागा (आरटीओ) कडून वजन मापे विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून त्यानंतर अंमलबजावणी सुरू होईल. 
शहरात एसटी, खासगी बस, रेल्वे, विमानाने शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील अनेक इच्छित ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाला प्राधान्य देतात. पण अनेकदा काही रिक्षाचालक संबंधित प्रवाशांकडून जादा भाडे घेतात. मीटर सुरू न करता थेट एक रक्कम भाडे म्हणून सांगितली जाते. रात्रीच्या वेळी असे प्रकास सर्रासपणे होतात. पण प्रवाशांना इतर पर्याय उपलब्ध नसल्याने जादा पैसे दिले जातात. यापार्श्वभुमीवर काही वर्षांपूर्वी शहरात स्वारगेट, शिवाजीनगर, रेल्वे स्टेशन, लोहगाव विमानतळ याठिकाणी प्री-पेड रिक्षा सेवा सुरू करण्यात आली. सुरूवातीला त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. पण कालांतराने ही सेवा बंद पडली. सध्या केवळ विमानतळ परिसरातच ही सेवा सुरू आहे. ही सेवा जुन्याच पध्दतीने सुरू असून अंतरानुसार आधीच भाडे निश्चित केलेले आहे. 
आता पुन्हा एकदा प्री-पेड रिक्षा सेवेला नवसंजीवनी मिळणार आहे. आरटीओकडून ही सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि संगणवाडी येथे प्री-पेड रिक्षा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, नव्याने ही सेवा सुरू करताना त्यासाठी ह्यजीपीएसह्ण यंत्रणेचा आधार घेतला जाणार आहे. प्रवासी प्री-पेड बुथवर आल्यानंतर त्यांना इच्छित स्थळ सांगावे लागेल. बुथवरील प्रतिनिधीकडून जीपीएसच्या माध्यमातून ते ठिकाण शोधले जाईल. ही यंत्रणा बुथ आणि इच्छित ठिकाणापर्यंतचा सर्वाधिक जवळचा रस्ता दाखवेल. त्यानुसार प्रवाशांना भाडे आकारले जाईल. या भाड्यावर पुर्वीप्रमाणेच सेवेसाठीचे २५ टक्के जादा पैसे आकारले जाणार आहे. 
-------------
जीपीएस यंत्रणेद्वारे प्री-पेडचा मार्ग व भाडे निश्चित करण्याची यंत्रणा अद्याप महाराष्टात कुठेही वापरली जात नाही. पुण्यात पहिल्यांदाच या यंत्रणेचा प्रस्ताव आहे. त्यामुळे जीपीएसद्वारे भाडे ठरविण्याची ही पध्दत योग्य आहे किंवा नाही, याबाबत वजन मापे विभागाकडून मार्गदर्शन घेतले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आरटीओकडून विभागाला पाठविण्यात आला आहे. विभागाकडून त्याची व्यावहारिकता तपासून प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल. त्यानंतरच प्री-पेडसाठी जीपीएसचा वापर करण्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती अधिकाºयांनी दिली.

Web Title: GPS Pre-paid system for Rickshaw fares: Proposal of RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.