शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

राज्यपाल विधानसभेत ढवळाढवळ करू शकत नाहीत, घटनातज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 07:19 IST

Maharashtra : विधानसभा ही एक सार्वभौम संस्था आहे. त्यामध्ये राज्यपाल व न्यायालयालादेखील ढवळाढवळ करता येत नाही, असे राज्यघटनेचे अभ्यासक प्रा. उल्हास बापट यांनी  ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पुणे :  राज्यघटनेच्या १७८ कलमांतर्गत विधानसभेच्या सभापती आणि उपसभापतींची निवड सदस्यांमार्फतच  केली जाते. ही निवड आवाजी पद्धतीने करायची किंवा गुप्त मतदान घेऊन करायची याबाबत घटनेत कोणताही उल्लेख नाही. त्याला राज्यघटनेचे कोणतेही बंधन नाही. त्याचे संपूर्ण अधिकार हे विधानसभेला दिलेले असतात. विधानसभा ही एक सार्वभौम संस्था आहे. त्यामध्ये राज्यपाल व न्यायालयालादेखील ढवळाढवळ करता येत नाही, असे राज्यघटनेचे अभ्यासक प्रा. उल्हास बापट यांनी  ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, राज्यपालपदाचा दुरूपयोग हा अगदी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत केला जात आहे. राज्यघटनेच्या १६३ कलमांतर्गत  मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांचा सल्ला हा राज्यपालांवर बंधनकारक आहे. फरक फक्त इतकाच आहे की, पंतप्रधानांचा सल्ला जसा राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे तसा राज्यपालांवर जो सल्ला बंधनकारक आहे, त्यात अपवाद (तारतम्य) देखील आहेत.

ती स्थिती कोणती असेल हे राज्यघटनेने ठरवून दिलेले आहे. राज्यघटनेने काही अधिकार राज्यपालांना दिले आहेत. परंतु, विधानसभेच्या  अध्यक्षपदाची निवड  आवाजी पद्धतीने किंवा गुप्त मतदान घेऊन करायची अथवा यापूर्वी जे विधानपरिषदेचे बारा सदस्य नेमायचा प्रश्न होता, तो राज्यपालांच्या अपवादांमध्ये मुळीच येत नाही. 

----------

कायद्यानुसार राज्यपालांना तसा अधिकार नाही. कोणत्या पद्धतीने निवडणूक घ्यावी याचा सर्वस्वी अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असतो. विरोधी पक्षांनी गुप्त मतदानाची मागणी लावू धरल्यास ती विचारात घेऊन अध्यक्षांनी निर्णय घेणे अपेक्षित असते; परंतु त्याप्रकारचे कोणतेही बंधन त्यांच्यावर नसते. अध्यक्षांच्या आदेशानुसारच ही निवडणूक प्रक्रिया पार पडते.    - ॲड. श्रीहरी अणे, माजी महाधिवक्ता

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा