शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

​५ ते १४ आॅक्टोबर दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा, शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठविण्याचे सरकारचे आवाहन  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 8:20 PM

मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात ५ आॅक्टोबर ते १४ आॅक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने तसेच हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या कालावधीत शेतक-यांनी कापणी केलेले तसेच कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावे, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी केले. 

मुंबई  - मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात ५ आॅक्टोबर ते १४ आॅक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने तसेच हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या कालावधीत शेतक-यांनी कापणी केलेले तसेच कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावे, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी केले. परतीच्या पावसाचा हा काळ आहे. वातावरणात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. खरीपाच्या पिकावर या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या कापणीयोग्य असलेल्या शेतमालास त्यामुळे फटका बसु शकतो. शेतमालाचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतक-यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा तसे नियोजन केले असेल तर तो माल व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी नियोजन करावे, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे. मुंबईसह कोकणातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याचेही फुंडकर यांनी सांगितले.  याकाळात वीज कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी बांधवांनी स्वत: चा आणि जनावरांचा विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली तसेच विजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर जवळ वीज कोसळण्याच्या घटना सर्रास घडतात. त्यामुळे पावसाच्या काळात असा ठिकाणी थांबू नये. कृषीविभागाकडून शेतक-यांना एसएमएसद्वारे अतिवृष्टीबाबतची माहिती देण्यात येईल. तसेच पालकमंत्र्यांनाही आपापल्या जिल्ह्यात याबाबत आवाहन करण्यास सांगण्यात आल्याचेही फुंडकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPandurang Phundkarपांडुरंग फुंडकर