पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या वारसांना सरकारी नोकरी - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 19:52 IST2019-02-24T19:02:57+5:302019-02-24T19:52:46+5:30
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या वारसांना सरकारी नोकरी - मुख्यमंत्री
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
रविवारी विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहा-पानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच, अर्थसंकल्पीय अधिवेशन असले तरी या अधिवेशनात संपूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार नाही. 27 फेब्रुवारीला संक्षिप्त अर्थसंकल्प मांडला जाईल. या अधिवेशनात 11 विधेयके मांडण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
याचबरोबर, अधिवेशनात एक दिवस दुष्काळावर चर्चा होणार आहे. सरकारकडून राज्यातील 42 लाख शेतकऱ्यांना मदत पोहोचली आहे. तर उर्वरित 40 लाख शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचेल. तसेच, राज्यातील 2 हजार 19 गावांना पाणी पुरवठा सुरु आहे. 32 हजार हेक्टरमध्ये चारा लागवड करण्यात येणार आहे, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.