शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

सरकार स्मार्ट सिटीची स्वप्नं दाखवता पण मुंबईसारख्या शहरात पक्कं गृहनिर्माण धोरण नाही- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 07:55 IST

सरकार स्मार्ट सिटीची स्वप्नं दाखवता पण मुंबईसारख्या शहरास पक्कं गृहनिर्माण धोरण नाही,अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसरकार स्मार्ट सिटीची स्वप्नं दाखवातं पण मुंबईसारख्या शहरास पक्कं गृहनिर्माण धोरण नाही,अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. मुंबईसारख्या शहरास पक्के गृहनिर्माण धोरण नाही, अशा शब्दात सामनातून राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे.

मुंबई, दि. बुधवारी मुंबईतील भेंडीबाजार परिसरात हुसैनी ही सहा मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत एकुण 34 जणांचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये धोकादायक इमारत कोसळण्याची ही काही पहिलीच घटना नाही. काही महिन्यांपूर्वी घाटकोपरमध्येही अशीच दुर्घटना घडली होती. इमारत पडणाच्या या घटनांवर सर्व स्तरातून टीका होते आहे. या घटनांना जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. मुंबईत घडणाऱ्या या घटनांमुळे मुंबई महापालिकेवरही टीका होते आहे. यावर सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून सरकारला प्रश्न विचारण्यात आला आहे.  मुंबई शहरात १२ हजार इमारती जीर्ण झाल्या आहेत व अखेरचा श्वास घेत आहेत. त्या धोकादायक इमारतीत हजारो कुटुंबं राहत आहेत. ही कुटुंबे डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार घेऊन जगत असतील तर त्यास जबाबदार कोण? राज्याचे गृहनिर्माण खातं नेमकं करतं काय? एका बाजूला ‘स्मार्ट सिटी’ची स्वप्ने दाखवायची व दुसऱ्या बाजूला मुंबईसारख्या शहरास पक्के गृहनिर्माण धोरण नाही, अशा शब्दात सामनातून राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे.

सामनाच्या अग्रलेखात लिहिलं आहे, 

मुंबईतील जनजीवन विस्कळीत होते, पण मुंबई पुन्हा त्याच वेगाने धावू लागते. मुंबईत एका दिवसात ३१५ मिलीमीटर पाऊस पडला व जलप्रलय आला. मुंबईची लोकसंख्या दीड कोटीवर पोहोचली आहे. बेकायदेशीर वस्त्या व त्यांनी फेकलेल्या प्लॅस्टिक कच-याने मुंबईला ‘बूच’ लागले आहे. एक महिन्याचा पाऊस जेव्हा एका दिवसात कोसळतो व हे असे ‘बूच’ लागल्यावर काय करायचे, याचा विचार करायची वेळ आली आहे.

डॉ. दीपक अमरापूरकर हे मुंबईतील मुसळधार पावसात बेपत्ता झाले व तिसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह वरळी समुद्राजवळ सापडला. उघड्या गटारामध्ये ते पडले व तिथून ते वाहत गेले. देश एका नामांकित पोटविकारतज्ञास मुकल्याने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. आम्ही स्वतः डॉ. अमरापूरकर यांना ओळखत होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणात ते ‘मातोश्री’वर येत होते व शिवसेनाप्रमुखांवर उपचार करीत होते. त्यामुळे त्यांचे हे असे जाणे नुसते चटका लावणारे नाही, तर धक्कादायक आहे. निसर्गाचे रौद्ररूप असे भयंकर असते की, त्याने किती जणांचा बळी घेतला आहे याचे हिशेब नंतर समजतात. मुंबई-ठाण्यात अनेक निरपराध्यांना २९ ऑगस्टच्या निसर्ग तांडवाचा फटका बसला असून कित्येकांना प्राण गमवावे लागले आहेत. भेंडीबाजार परिसरात ११७ वर्षांची जुनी इमारत कोसळून त्यात ३३ जणांना प्राण गमवावे लागले, अनेक जण गंभीर जखमी झाले. त्या इमारतीचा क्षणात मातीचा ढिगारा झाला व अनेक हसती खेळती कुटुंबे त्या ढिगाऱयाखाली कायमची दबली गेली. 

मुसळधार पावसात जुन्या–मोडकळीस आलेल्या इमारती कोसळण्याच्या दुर्घटना होतात व लोक प्राणास मुकतात. म्हाडाने धोकादायक ठरवूनही या इमारती रिकाम्या केल्या जात नाहीत व असे अपघात झाल्यावर धावाधाव होते, एकमेकांवर खापर फोडले जाते. मुंबई शहरात १२ हजार इमारती जीर्ण झाल्या आहेत व अखेरचा श्वास घेत आहेत. त्या धोकादायक इमारतीत हजारो कुटुंबे राहत आहेत. ही कुटुंबे डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार घेऊन जगत असतील तर त्यास जबाबदार कोण? राज्याचे गृहनिर्माण खाते नेमके करते काय? एका बाजूला ‘स्मार्ट सिटी’ची स्वप्ने दाखवायची व दुसऱया बाजूला मुंबईसारख्या शहरास पक्के गृहनिर्माण धोरण नाही. बडय़ा बिल्डरांचे ‘टॉवर्स’ ज्या वेगाने उभे राहतात व बिल्डरांच्या फायलींना सरकारदरबारी जी गती मिळते तो वेग गरीबांच्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या नशिबी नसतो. पुनर्विकासाचे विषय हे अस्पृश्यच ठरतात व एस.आर.ए. प्रकल्पांची पाने पुढे सरकत नाहीत. तिथे सर्वच पातळीवर भ्रष्टाचार आहे. मुंबईत ज्या इमारतींची तातडीने पुनर्बांधणी आवश्यक आहे अशा आजच्या घडीला १४ हजार इमारती उद्धाराच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी अतिधोकादायक ठरलेल्या इमारतींची संख्या वाढत आहे व अशा इमारती कोसळून त्यात माणसे मरत आहेत. मग ही माणसे म्हाडाच्या हलगर्जीपणामुळे मेली की महापालिकेच्या बेफिकिरीमुळे मृत झाली असे एकमेकांवर खापर फोडण्याचे प्रकार दुसरी इमारत कोसळेपर्यंत सुरूच राहतात. मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती रिकाम्या करायला हव्यात, पण त्या इमारतींमधील रहिवाशांनी राहायला जायचे कुठे, याचे उत्तर आज कुणाकडे नाही. ‘ट्रान्झिट कॅम्प’ म्हणून जो काही प्रकार आहे त्यापेक्षा ‘नरक’ किंवा छळछावण्या बऱया. त्यामुळे लोक मोडकळीस आलेल्या इमारतीत राहून मरण पत्करतात, पण त्या ‘ट्रान्झिट कॅम्प’मध्ये जायला धजावत नाहीत. मुंबईतील जनजीवन विस्कळीत होते, पण मुंबई पुन्हा त्याच वेगाने धावू लागते. मुंबईत एका दिवसात ३१५ मिलीमीटर पाऊस पडला व जलप्रलय आला. मुंबईची लोकसंख्या दीड कोटीवर पोहोचली आहे. बेकायदेशीर वस्त्या व त्यांनी फेकलेल्या प्लॅस्टिक कचऱ्याने मुंबईला ‘बूच’ लागले आहे. एक महिन्याचा पाऊस जेव्हा एका दिवसात कोसळतो व हे असे ‘बूच’ लागल्यावर काय करायचे, याचा विचार करायची वेळ आली आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाBuilding Collapseइमारत दुर्घटना