शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

गर्भसंस्कार पुस्तकाविरोधात सरकारने सुप्रीम कोर्टात जावे

By admin | Updated: August 18, 2016 04:06 IST

आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकात बालाजी तांबे यांनी गर्भलिंग निदान कायद्याचा भंग केलेला आहे. याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात शासनाची योग्य भूमिकाच

अहमदनगर : ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकात बालाजी तांबे यांनी गर्भलिंग निदान कायद्याचा भंग केलेला आहे. याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात शासनाची योग्य भूमिकाच मांडली गेलेली नाही. त्यामुळे शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल करावे, अशी मागणी मूळ तक्रारदार गणेश बोऱ्हाडे, गर्भलिंग निदान विरोधातील देशपातळीवरील केंद्रीय समितीच्या सदस्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी केली आहे. बोऱ्हाडे यांनी राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त संचालकांना लेखी निवेदनच दिले आहे. तांबे यांनी या पुस्तकात मुलगा होण्याबाबतचे उपाय सांगितलेले आहेत. हा सरळसरळ कायद्याचा भंग आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठानेही तसे मत प्रदर्शित केले आहे. त्यानंतरच नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संगमनेर न्यायालयात तांबे, पुस्तकाचे प्रकाशक अभिजीत पवार व विक्रेत्याविरुद्ध फिर्याद दाखल केली, याकडे बोऱ्हाडे यांनी लक्ष वेधले आहे.शासकीय अधिकारी याप्रकरणात दबावाखाली आहेत. आपण तांबे यांच्या पुस्तकाबाबत तक्रार दिल्यानंतर नगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी आरोग्य विद्यापीठाचे म्हणणे मागविले. याबाबत विद्यापीठाला गत २० जानेवारीला पत्र पाठविण्यात आले. मात्र, विद्यापीठाने तब्बल चार महिन्यानंतर म्हणजे २० मे रोजी अभिप्राय कळविला. त्यासाठी त्यांना दोनदा स्मरणपत्रे पाठवावी लागली. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांनी महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिनचाही (एमसीआयएम) अभिप्राय मागविला. मात्र, अद्यापपर्यंत तो मिळालेला नाही. तांबे औरंगाबाद खंडपीठात गेले व खंडपीठाने हा गुन्हा रद्द केल्याचा निकाल दिल्याचे आपण वृत्तपत्रात वाचले. खंडपीठाचे निकालपत्रक अद्याप मिळाले नसल्याने त्यावर भाष्य करावयाचे नाही. मात्र, यासंदर्भात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात तातडीने अपिल दाखल करणे आवश्यक असल्याचे बोऱ्हाडे यांचे म्हणणे आहे. तांबे यांनी आयुर्वेदातील ग्रंथांच्या आधारे हे पुस्तक लिहिले, असा दावा ते स्वत: व त्यांचे समर्थक वृत्तपत्रातून करत आहेत. मात्र, पुराणातील बाबींना कायद्याची मान्यता नाही, हे संबंधितांनी लक्षात घ्यावे. पुराणात चातुर्वण्य व सतीची प्रथा सांगितली म्हणून तुम्ही त्याचे समर्थन करणार का?, असा सवाल बोऱ्हाडे यांनी केला आहे. ‘एमसीआयएम’ला वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही तांबे यांची वैद्यकीय पदवी मिळत नाही. पदवी हरविल्याचे सांगितले जाते. मग तांबे यांनी वैद्यकीय सेवेसाठी १९८७ साली नोंदणी कशाच्या आधारे केली व १९९१ नंतर त्यांनी नोंदणीचे नूतनीकरण केले नसतानाही ‘एमसीआयएम’ने कारवाई का केली नाही? असा बोऱ्हाडे यांचा प्रश्न आहे. पदवी असेल तर ती जाहीर करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)तक्रारदाराच्या जीवाला धोकागर्भसंस्कार पुस्तकाबाबत तक्रार करण्यात आली असून याप्रकरणी आपल्या जीवाला धोका असल्याने संरक्षण मिळावे, असा अर्ज गणेश बोऱ्हाडे यांनी पोलिसांकडे दिला आहे. देशात कोणतीही वैद्यकीय उपचार पद्धती (पॅथी) ही घटनेच्या चौकटीतच चालवावी लागेल. आयुर्वेदातील जुन्या ग्रंथांत मुलगा होण्याबाबत काही उपाय सांगितले म्हणून तसा प्रचार करणे हा गुन्हा आहे. बालाजी तांबे यांनी ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकात तसा प्रचार केलेला आहे. त्यामुळे शासनाने सर्वोच्च न्यायालयात जाणे आवश्यक आहे, अन्यथा काळ सोकावण्याचा धोका आहे. कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्याविरुद्ध न्यायालयात जाण्याचा पर्याय आमच्याकडे आहे.- अ‍ॅड. वर्षा देशपांडे, प्रवर्तक, लेक लाडकी अभियान