शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सरकार विचारधारेवर नव्हे, किमान समान कार्यक्रमावर चालते; संजय राऊतांचे अजित पवारांबाबत सूतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 06:19 IST

खा. संजय राऊत, महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवारांची भूमिका महत्त्वाची असेल

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोणतेही सरकार चालविण्यासाठी विचारधारा (आयडियालॉजी) नव्हे तर किमान समान कार्यक्रम लागतो. महाविकास आघाडी सरकारकडे असा कार्यक्रम आहे. हे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल आणि त्यात अजित पवारांची भूमिका महत्त्वाची असेल. ते सरकारमध्ये असणे ही गरज आहे, असे मत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

महाविकास आघाडीचे ‘चाणक्य’ अशी नवी ओळख निर्माण झालेले खा. राऊत सध्या नागपुरात आहेत. येत्या २९ डिसेंबर रोजी ते पुण्यात खा. शरद पवार यांची पुन्हा महामुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी त्यांनी खा. पवार यांची भेट घेतली. त्यानंतर लोकमतशी झालेली बातचित अशी-

प्रश्न : महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यापूर्वी नेहरू सेंटरमध्ये जे काही घडले, त्यामुळे अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असे वाटते?- राजकारणात एखादा प्रसंग असा घडतो की प्रमुख नेता अस्वस्थ होतो व भावनेच्या भरात निर्णय घेऊन टाकतो. अजित पवार यांच्या बाबतीत नेमके हेच घडले आहे. जे त्यांना ओळखतात, त्यांना या गोष्टीचे कधीच आश्चर्य वाटणार नाही. अजित पवार यांच्या जागी जर मी असतो तर कदाचित मीही तसाच वागलो असतो. म्हणून मला वाटते की जे झाले ते विसरुन आम्ही पुढे गेले पाहिजे. अजित पवार यांच्यासारखा अनुभवी माणूस सरकारमध्ये असणे ही सरकारची गरज आहे.

प्रश्न : काँग्रेस, शिवसेना आणि राष्टÑवादी यांची विचारधारा एकसमान नाही, मग सरकार कसे चालणार?- पुन्हा तेच सांगतो. सरकार चालविण्यासाठी विचारधारा नव्हे, तर किमान समान कार्यक्रम लागतो. सर्वांना अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत सुविधा देणे, सामाजिक न्याय, महिलांच्या जगण्याचा स्तर उंचावणे हेच महत्त्वाचे कार्यक्रम असतात. तुम्ही सोमालिया, हैती किंवा रशियात अथवा अमेरिकेत जा. हेच पहायला मिळेल तुम्हाला. आयडियॉलॉजीने पोट भरत नाही.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करताना आयडियॉलॉजी सांगितली; पण भाषा मात्र शेवटी त्यांनीही पोटाचीची केली ना... आमचे मराठी तरुण उपाशी राहू नयेत, त्यांच्या हाताला काम मिळावे म्हणून त्यांनी त्यावेळी वडापाव विकायला सांगितलाच ना...

प्रश्न : शरद पवार यांच्या भूमिकेविषयी कधी संशय आला नाही?- मुळात शरद पवारांबाबत अशी शंकाच का यावी? त्यांचा इतिहास पारदर्शक आहे. त्यांनी दगबाजी केलीे असे एक तरी उदाहरण दाखवा. त्यांचे राजकारण नेहमी विकासाच्या मुद्यांवरच राहिले आहे. शरद पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडले असे सांगितले जाते. पण त्याआधी आणि नंतर कधी सरकारे पडली नाहीत का? किंबहुना भाजपने महाराष्टÑात आमच्यासोबत जेवढे विश्वासघातकी राजकारण केले तेवढे तर कुणीच केलेले नाही.

प्रश्न : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानावर वादंग निर्माण झाले. अशी विधाने पुढे होत राहिली तर त्याचा सरकारवर किती परिणाम होईल?- हे सरकार पूर्ण पाच वर्षे काम करेल. राहुल गांधी यांचे विधान त्यांच्यापाशी. आम्ही त्यांना योग्य भाषेत समज दिली आहे आणि तो आमचा अधिकार आहे. आमचे म्हणणे आम्ही मांडले. ज्याला आयडियॉलॉजी म्हणता, ती आयडियॉलॉजी सरकारच्या आड आली नाही. ते बोलले पण आम्ही त्यांचा गैरसमज दूर केला. यापुढे राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची जबाबदारी आहे की राहुल गांधी यांना भेटून त्यांच्या मनात असे काही विषय असतील तर त्यांचे गैरसमज त्यांनी दूर केले पाहिजेत.

प्रश्न : नगरविकास, गृह आणि महसूल या तीन खात्यांपैकी प्रत्येकी एक खाते तीन पक्षांकडे असेल, असे ठरले असताना नगरविकास आणि गृह शिवसेनेकडे कसे आले?- नागपूर अधिवेशनापुरती ही केलेली व्यवस्था आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खाते वाटपात पुन्हा काही बदल होतील. त्यावेळी चित्र स्पष्ट होईल. आमच्यात कोणताही वाद नाही. खातेवाटपाबद्दल आमची चर्चा पूर्ण झाली आहे.

प्रश्न : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एकही महत्त्वाचे खाते स्वत:कडे का ठेवले नाही?- मुख्यमंत्री म्हणून सर्व खात्यांची अंतिम जबाबदारी शेवटी त्यांच्याकडेच असते. सत्तेचे विक्रेंद्रीकरण करावेच लागते तरच राज्याचा कारभार चांगला चालतो. मी करेन ती पूर्वदिशा असे कधीच होत नसते.मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर अनेक खात्याची ओझी घेऊन फिरु लागले तर ते राज्याच्या विकासाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. आमच्याकडे बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे असे सगळे अनुभवी नेते आहेत.

आमचा शोले पूर्ण पाच वर्षे चालेल..!महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या काळात तिन्ही पक्षाचे नेते एकमेकांच्या संपर्कात होते. मी रोज सकाळी भूमिका मांडत होतो. त्यावर सगळे पुढे जात होते. हे ठरवून केले. मी त्या काळात रंगभूमीवरचा एक साधा कलावंत होतो. मला त्या काळात उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका दिली ती मी नीट वठविण्याचा प्रयत्न केला. त्यातून आमचा शो हाऊसफुल झाला आणि पुढे हा शो पाच वर्षे हाऊसफुल चालेल. आम्ही ‘शोले’ चा देखील विक्रम मोडित काढू!

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस