शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

अखेर फॉरेन्सिक विभागातील रिक्त पदांच्या भरतीला हिरवा कंदील

By जमीर काझी | Published: October 01, 2021 7:48 AM

राज्यातील विविध न्याय सहायक वैधानिक प्रयोगशाळा संचालनालयात  २९१ पदे भरली जाणार आहेत.

ठळक मुद्देराज्यातील विविध न्याय सहायक वैधानिक प्रयोगशाळा संचालनालयात  २९१ पदे भरली जाणार आहेत.

जमीर काझीमुंबई : गुन्ह्याच्या शास्त्रोक्त व तांत्रिक पुराव्याच्या तपासासाठी कार्यरत फॉरेन्सिक लॅबमधील विविध दर्जाची तंत्रज्ञांची रिक्त पदे भरण्याबाबत राज्य सरकारला अखेर जाग आली आहे. राज्यातील विविध न्याय सहायक वैधानिक प्रयोगशाळा संचालनालयात  २९१ पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी १८७ पदे  सरळ सेवेने तर १०४ जागा बाह्ययंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत.

पद भरतीबाबतच्या प्रलंबित प्रस्तावाला अखेर गृह विभागाने मान्यता दिली आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे राज्यभरातील साडे सहा हजार डीएनए चाचणीचे अहवाल रखडल्याचे ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले होते. त्याबाबत २२ व २३ सप्टेंबरला वृत्त प्रसिद्ध करून तंत्रज्ञांअभावी पोस्को व महिला अत्याचारासंबंधीचे गुन्हे प्रलंबित असल्याचे आकडेवारीनिशी मांडले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या गृह विभागाने त्याला मान्यता देऊन भरतीची कार्यवाही करण्याची सूचना संचालनालयाला केली आहे. 

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना  फॉरेन्सिक लॅबकडे अपुऱ्या अधिकारी व तंत्रज्ञ मनुष्यबळामुळे तब्बल ६,४५१ डीएनए तपासणीची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामध्ये महिलांवरील अत्याचार व पोक्सोच्या गुन्ह्यातील २२०० वर केसेसचा समावेश आहे. गेल्या ५ वर्षातील ही प्रकरणे असून त्याबाबतचा प्रस्ताव रखडल्याचे ‘लोकमत’ने मांडले होते. त्यानंतर सरकारने फॉरेन्सिक लॅबचे संचालक यांच्या ६  नोव्हेंबर २०२० च्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या नवीन पद भरतीसाठी वित्त विभागाने ३० जुलै रोजी मान्यता दिली होती. मात्र गृह विभागाकडून त्याचे अध्यादेश जारी करणे बाकी होते. मिळालेल्या माहितीनुसार या विभागात गट-अ ते गट -ड या संवर्गत सरळ सेवेतील  एकूण ३३७ रिक्त पदे आहेत. त्यामध्ये १८७ पदे सरळ सेवेने भरली जाणार आहेत तर, १०४ जागा आऊट सोर्सिंगद्वारे भरण्याला शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे.

ही पदे भरली जाणारपद भरतीला मान्यता दिलेल्या १८७  पदांमध्ये  गट-अ मधील उपसंचालक-६,सहायक संचालक-१७, गट -ब मधील सहायक रासायनिक विश्लेषक ३३, वैज्ञानिक अधिकारी-१७ आदींचा समावेश आहे. तर, वाहनचालक-३, प्रयोगशाळा परिचर-७१ आदी जागा बाह्य यंत्रणेद्वारे भरल्या जाणार आहेत.

फॉरेन्सिक लॅबमधील रिक्त पदे भरण्याला मान्यता देण्यात आली आहे. त्याची कार्यवाही लवकर करण्याची सूचना केली आहे. जेणेकरून त्याठिकाणी प्रलंबित केसेस लवकर निकालात निघतील.सतेज पाटील, गृह राज्यमंत्री

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलjobनोकरी