शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीचे सरकारला गांभीर्य नाही, शरद पवार यांचा आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 06:51 IST

राज्यात अनेक ठिकाणी मोठा दुष्काळ पडला असून, पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत, जनावरे तडफडत आहेत. यावर तात्काळ मार्ग काढण्याची गरज आहे.

मुंबई  - राज्यात अनेक ठिकाणी मोठा दुष्काळ पडला असून, पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत, जनावरे तडफडत आहेत. यावर तात्काळ मार्ग काढण्याची गरज आहे. पण दुष्काळाची सरकारने गांभीर्याने दखल घेतली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा पक्षाने घेतला आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. दुष्काळी संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन निर्णय घेण्यामध्ये सरकार कमी पडले. दुष्काळाबाबत दौरे करण्यास व निर्णय घेण्यास सरकारला उशीर झाला आहे. सरकारने फळबागा वाचविण्यासाठी अतिरिक्त मदत द्यावी. पशुधन वाचविण्यासाठी निधी वाढवावा. शेतकऱ्यांकडून होत असलेली सर्व प्रकारची वसुली त्वरित थांबवावी. कर्जमाफी व कर्ज पुनर्गठनाबाबत निर्णय घ्यावा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क माफ करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. दुष्काळ निवारणाचे काम करताना निवडणूक आयोगाचा अडथळा होत नाही, असा आपला अनुभव असल्याचे पवार म्हणाले.मुख्यमंत्र्यांची घेतली भेटराज्यातील भीषण दुष्काळाबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, राजेश टोपे हे या शिष्टमंडळात होते.राज यांच्या सभांचा खर्च मागण्याचा अधिकार नाहीराज ठाकरे यांची पाठराखण करताना पवार म्हणाले की, राज यांच्या पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्याने त्यांच्याकडून सभांचा खर्च मागणे चुकीचे आहे. या काळात आपली मते मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला असून, तो लोकशाहीने दिलेला आहे. १९७७ मध्ये आणीबाणीविरोधात पु. ल. देशपांडे व इतरांनी प्रचार केला होता. मात्र, त्यांच्याकडून कोणीही प्रचाराचा खर्च मागितला नव्हता, याचे स्मरण पवारांनी आयोगाला करून दिले.मोदी काहीही बोलतात : पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलतात. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने जबाबदारीने वक्तव्य करण्याची गरज आहे. निकालानंतर देशात नवीन सरकार अस्तित्वात येईल. राष्ट्रपतींनी संधी दिल्यावर बहुमत सिद्ध करण्याचे आव्हानात्मक काम केवळ आम्हीच करू, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. संरक्षणमंत्री म्हणून मी काम केले आहे. आम्ही संरक्षण खात्याच्या कामगिरीचा वापर कधीही राजकारणासाठी केला नाही. दलाच्या कामगिरीचा गैरवापर निवडणुकीसाठी केला जाणे दुर्दैवी आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्ती असा गैरवापर करत आहे, हे अधिक दुर्दैवी आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारचे कान टोचले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारdroughtदुष्काळMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार