सरकारी रुग्णालयांमधील प्रसूतिगृहांचे रूपडे पालटणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 06:54 IST2018-08-24T02:11:36+5:302018-08-24T06:54:39+5:30
माता, बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्राचे पाऊल

सरकारी रुग्णालयांमधील प्रसूतिगृहांचे रूपडे पालटणार
- समीर देशपांडे
कोल्हापूर : देशभरातील माता, बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र शासनाने ‘लक्ष्य’ प्रकल्प आखला असून त्याअंतर्गत महाराष्ट्रातील १२३ शासकीय रुग्णालयांमधील प्रसूतीगृहांचे रूपडे पालटणार आहे. यासाठी मोठा निधी प्राप्त होणार असून वर्षभरात प्रकल्प साकारला जाईल.
भारतातील माता, बालमृत्यु प्रमाण २०२० पर्यंत प्रति १ लाख जन्मांमागे १०० पेक्षा कमी आणि महाराष्ट्रातील हेच प्रमाण ४० पेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. सध्या भारताचा हा दर १५० हून अधिक, तर महाराष्ट्राचा ६१ इतका आहे. बालमृत्यूचा भारताचा दर २८ आहे, तो २३ करणे आणि महाराष्ट्राचा सध्या १९ आहे, तो कमी करणे असेही उद्दिष्ट आहे.
थोडक्यात घरी प्रसूती न होता ती सरकारी दवाखान्यात व्हावी, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे.
या रुग्णालयांचा समावेश
१८ जिल्हा रुग्णालये, १३ स्त्री रुग्णालये, ४ सामान्य रुग्णालये, ५० आणि १०० खाटांची सर्व उपजिल्हा रुग्णालये, २ शासकीय महाविद्यालये.
रुग्णालयांमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढावे, या प्रमुख उद्देशाने केंद्र शासनाने ‘लक्ष्य’ प्रकल्प आखला आहे.
- डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा शल्य चिकि त्सक, कोल्हापूर