Government did not come because of unity: Chandrakant Patil | एकोप्याने वागलो नाही म्हणून सरकार आले नाही : चंद्रकांत पाटील
एकोप्याने वागलो नाही म्हणून सरकार आले नाही : चंद्रकांत पाटील

ठळक मुद्दे- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सोलापूर दौºयावर- भाजप पदाधिकाºयांच्या घेतल्या बैठका- जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडीबाबत घेतला आढावा

सोलापूर :  शरद पवार पावसात भिजले, त्यांच्या इडीच्या चौकशीनंतर वातावरण बदलले म्हणून राज्यातील सरकार बदलले याबद्दल बोलले जाते. पण आपण एकोप्याने वागलो नाहीत म्हणून आपलं सरकार आलं नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे स्पष्ट  केले.

भाजपने महापौर, उपमहापौर निवडीत वर्चस्व कायम ठेवले. यानिमित्त चंद्रकांतदादांकडून भाजपचे नगरसेवक, शहर पदाधिकाºयांना होटगी रोडवरील हेरीटेज हॉलमध्ये मेजवाणी देण्यात आली. यावेळी पदाधिकारी आणि नेत्यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.
पक्षाचे अनेक उमेदवार यामुळेच पडले. आता तीन वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र आले आहेत. हे किती दिवस एकत्र राहतील माहित नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला. 

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शरद पवार यांनी खूप गांभीर्याने घेतली आहे. या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असल्याचे त्यांना माहित झाले आहे. पदवीधर मतदार नोंदणीत शहराचे योगदान खूप कमी आहे याबद्दलही चंद्रकांतदादांनी नाराजी व्यक्क्त केली.  

Web Title: Government did not come because of unity: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.