अंगणवाडीसाठी शासनाचा निर्णय;१३ हजार महिलांची नोकरी जाणार, सेविकांची सेवासमाप्ती ६०व्या वर्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 03:18 AM2018-02-28T03:18:27+5:302018-02-28T03:18:27+5:30

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या सेवासमाप्तीचे वय ६५वरून ६० करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

 Government decision for Anganwadi; 13 thousand women will be employed, Sevick's service will be 60 years old | अंगणवाडीसाठी शासनाचा निर्णय;१३ हजार महिलांची नोकरी जाणार, सेविकांची सेवासमाप्ती ६०व्या वर्षी

अंगणवाडीसाठी शासनाचा निर्णय;१३ हजार महिलांची नोकरी जाणार, सेविकांची सेवासमाप्ती ६०व्या वर्षी

Next

विश्वास पाटील 
कोल्हापूर : अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या सेवासमाप्तीचे वय ६५वरून ६० करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासंबंधीचा आदेश २३ फेब्रुवारीस महिला व बालविकास विभागाने काढला असून, त्याविरोधात अंगणवाडी तार्इंतून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. नव्या आदेशामुळे राज्यातील सुमारे १३ हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचाºयांना १ एप्रिलपासून घरी जावे लागणार आहे.
अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनामध्ये दरवर्षी वेतनवाढीप्रमाणे वाढ करण्याची शासनास शिफारस करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सेविकांच्या संघटनेच्या पदाधिकाºयांचा समावेश असलेली समिती २० जुलै २०१६च्या निर्णयान्वये स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने ९ मार्च २०१७ रोजी अहवाल दिला. त्यात सेवासमाप्तीचे वय कमी करण्याची शिफारस केली. त्यानुसार वय कमी केल्याचे शासनाचे म्हणणे आहे. राज्य शासनाने आमच्यात मानधनात वाढ केली आणि सेविकांची नोकरीही काढून घेतली. याविरोधात आम्ही पुन्हा आंदोलनाची हाक देणार असल्याचे महाराष्ट्र राज्य पूर्वप्राथमिक सेविका व अंगणवाडी कर्मचारी महासंघांच्या जनरल सेक्रेटरी सुवर्णा तळेकर यांनी सांगिले.

Web Title:  Government decision for Anganwadi; 13 thousand women will be employed, Sevick's service will be 60 years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.