सरकार म्हणजे बश्या बैल, त्यांना रुमण्याचा हिसका दाखवा : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 03:10 IST2018-01-22T03:09:56+5:302018-01-22T03:10:14+5:30

शेतक-यांशी आणि शेतीशी भाजपा सरकारचा काहीच संबंध नाही. हे सरकार म्हणजे बश्या बैल आहे, त्यांना वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रु मण्याचा हिसका दाखवावाच लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित यांनी उमरी येथे रविवारी जाहीर सभेत केले.

 The government is a bullshit, show leniency in it: Ajit Pawar | सरकार म्हणजे बश्या बैल, त्यांना रुमण्याचा हिसका दाखवा : अजित पवार

सरकार म्हणजे बश्या बैल, त्यांना रुमण्याचा हिसका दाखवा : अजित पवार

नांदेड : शेतक-यांशी आणि शेतीशी भाजपा सरकारचा काहीच संबंध नाही. हे सरकार म्हणजे बश्या बैल आहे, त्यांना वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रु मण्याचा हिसका दाखवावाच लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित यांनी उमरी येथे रविवारी जाहीर सभेत केले.
पवार म्हणाले, सरकारमधील लोकांना गाय, बैल, रेडकू यातला फरक कळत नाही. यांना शेतीतले काहीच समजत नाही तेव्हा या सरकारला वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रु मण्याचा (चाबूक) हिसका दाखवाच. आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था आज नारायण राणेंची झाली आहे़ कारण भाजपाने त्यांना गाजर दाखविले आहे़ त्यामुळे भाजपाचे निवडणूक चिन्ह बदलून गाजर केले पाहिजे. राणे आता हताश झाले आहेत़ त्यांनी आता माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, मला मंत्री करा अशी धमकी मुख्यमंत्र्यांना दिली़ राणे म्हणतात, मी मुख्यमंत्री होतो़ आता मला किमान मंत्री तरी करा़ मुख्यमंत्रीपदी राहिलेल्याने कसे रुबाबदार राहावे़ परंतु मंत्रिमंडळातील प्रवेश लांबत चालल्याने राणे आता हताश झाले आहेत़ आजी मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांची अशी केविलवाणी अवस्था केल्याचा टोलाही पवार यांनी लगावला़ हल्लाबोल यात्रेतील सभेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री कमलिकशोर कदम आदी उपस्थित होते.

Web Title:  The government is a bullshit, show leniency in it: Ajit Pawar