Gosekhurd project to be completed by 2023, assures Chief Minister Uddhav Thackeray | गोसेखुर्द प्रकल्पाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन 

गोसेखुर्द प्रकल्पाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन 

ठळक मुद्देयावेळी उमरेडचे आमदार राजू पारवे, तुमसरचे आमदार राजू कारेमोरे व भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर तसेच सर्व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

पवनी (भंडारा) : भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण करुन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले केले. इंदिरा सागर राष्ट्रीय गोसेखुर्द प्रकल्पाला शुक्रवारी भेट दिल्यानंतर राजीव टेकडीवर आयोजित बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. 

राज्याचे तिजोरीत निधीचा खळखळाट आहे. त्यामुळे आश्वासन देणे संयुक्तिक होणार नाही, तरीही शेतकरी बांधवांना सिंचनाचे सोयीसाठी निधी उपलब्ध करून प्रकल्प पूर्ण करावाच लागेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 

यावेळी उमरेडचे आमदार राजू पारवे, तुमसरचे आमदार राजू कारेमोरे व भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर तसेच सर्व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Gosekhurd project to be completed by 2023, assures Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.