शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Good News; सोलापूर शहरात थेट पाईप लाईनने होणार गॅसचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 13:13 IST

स्मार्ट सिटी प्रोजेक्ट; ३६ किलोमीटरपर्यंतच्या खोदाई कामासाठी आयएमसी कंपनीचा अर्ज

ठळक मुद्देआयएमसी कंपनीने शहरात थेट पाईप लाईनने गॅस पुरवठा करणार शहरात जवळपास ३०० किमी अंतराची पाईप लाईन टाकण्यात येणारपहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटी एरियातील काम करण्याचा प्रस्ताव

सोलापूर : घरपोच गॅस लाईनची सुविधा देण्यासाठी आयएमसी कंपनीकडून शहरात गॅसची पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. या कामाच्या खोदाईला परवानगी मिळावी, असा अर्ज कंपनीने महापालिका प्रशासनाकडे केला आहे. 

चेन्नई येथील आयएमसी कंपनी शहरात नैसर्गिक वायूचा पुरवठा करणार आहे. यामध्ये घरगुती वापरासाठी थेट पाईप लाईनमधून पुरवठा करणे, वाहनांसाठी इंधन म्हणून सीएनजी, औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगांना इंधन म्हणून गॅस पुरवठा करणार आहे. हे पर्यावरण पूरक इंधन आहे. गॅस पाईप लाईनच्या कामासाठी शहरात पहिल्या टप्प्यात ३६ किलोमीटरची खोदाई करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

या कामाला परवानगी मिळावी, असा अर्ज कंपनीच्या प्रतिनिधींनी महापालिका आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे केला. शहरात स्मार्ट सिटी, अमृत योजनेतून रस्त्याच्या खोदाईची कामे सुरू आहेत. पुन्हा खोदाई केल्यास लोक हैराण होतील. त्यामुळे ३६ किलोमीटर ऐवजी २७ किलोमीटरला परवानगी देण्याचा विचार असल्याचे आयुक्त तावरे यांनी सांगितले. परंतु, ही पाईप लाईन शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य केल्यास ३६ किमी मार्गावर परवानगी देण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. कंपनीचा अर्ज दाखल करुन घेण्यात आला आहे. प्रशासकीय पातळीवर चर्चा करुन पुढील परवानगी देण्यात येणार आहे.

पंपही सुरू करणार- आयएमसी कंपनीने शहरात थेट पाईप लाईनने गॅस पुरवठा करणार आहे. यासाठी शहरात जवळपास ३०० किमी अंतराची पाईप लाईन टाकण्यात येणार आहे.  पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटी एरियातील काम करण्याचा प्रस्ताव आहे.  शिवाय वाहनांसाठी चार पंप सुरू करण्याचे नियोजन आहे. या पंपासाठी जागाही घेण्यात आल्या आहेत. - सोलापूर शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रोजेक्ट

टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाPetrol Pumpपेट्रोल पंप