Good News: बळीराजा सुखावला; राज्यात मान्सून डेरेदाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 02:08 PM2020-06-11T14:08:16+5:302020-06-11T14:42:11+5:30

मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Good News: Monsoon arrived in Maharashtra today on 11 Jun | Good News: बळीराजा सुखावला; राज्यात मान्सून डेरेदाखल

Good News: बळीराजा सुखावला; राज्यात मान्सून डेरेदाखल

Next

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे काहीसा लांबलेला मान्सून राज्यात डेरेदाखल झाला आहे. 11 जून म्हणजे आज, गुरुवारी मान्सूनने हजेरी लावल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. 

मान्सूनने हर्नाई, सोलापूर, रामगुंडम आणि जगदलपूर असा प्रवास सुरु केला असून पुढील 48 तासांत राज्यातील मोठा भाग व्यापणार आहे. या काळात मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 
 

चक्रीवादळामुळे वाटचालीची गती मंदावल्याने गेल्या तीन दिवसांपासून चकवा देणारा मान्सून येत्या २४ तासांत महाराष्ट्रात दाखल होईल, अशी आनंदवार्ता हवामान विभागाने दिली होती. बुधवारी मराठवाड्यात लातूर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पाऊस झाला असला तरी या मान्सूनपूर्व सरी आहेत. मऱ्हाटी मुलुखात दाखल झाल्यानंतर गोव्यासह दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मान्सूनच्या आनंदसरींचा प्रथम वर्षाव होईल आणि त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने राज्य व्यापेल, असाही अंदाज होता.

बंगालच्या उपसागरातील अनुकूल हवामानामुळे मान्सूनचा पुढील प्रवास वेगाने सुरू असून, बुधवारी तामिळनाडूच्या उर्वरित भागात, पश्चिम मध्य व उत्तर बंगालच्या आणखी काही भागात, त्रिपुरा व मिझोरामच्या काही भागात दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामानशास्त्र विभागाने केली. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओरिसा, छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. २४ तासांत दक्षिण कोकण गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून, त्यापुढील दोन ते तीन दिवसांत म्हणजे १२ ते १३ जूनच्या आसपास मुंबईत दाखल होईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी बरसणाऱ्या मान्सूनपूर्व सरींमुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमान घटले आहे. गेल्या २४ तासांत चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ४१.५ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली.

 

१२ जूनपासून अधिक सक्रीय
सध्याची स्थिती विचारात घेता राज्यात १२ जूनपासून मान्सून अधिक सक्रिय होईल.
त्यामुळे सर्वत्र दमदार पाऊस होऊन १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्यभरात मान्सूनची वृष्टी सुरू होईल.
तळकोकणातून पुढे सरकताना पुणे व नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस होईल, असाही इशारा देण्यात आला आहे़

अन्य महत्वाच्या बातम्या...

सावध व्हा! पहिली ओसरली नाहीय, देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता

CoronaVirus: 15 जूनपासून देशात पुन्हा कडक लॉकडाऊन? केंद्राचा मोठा खुलासा

उलट्या बोंबा! ५००० कोटींचा घोटाळा; छाप्यात लाखोंच्या पर्स खराब केल्याने भरपाईची मागणी

Rajyasabha Election: राजस्थानमध्ये काँग्रेस संकटात; अशोक गेहलोतांकडून आमदारांची बैठक

CoronaVirus धक्कादायक! उत्पन्नाशिवाय एक महिनाही जगू शकत नाहीत निम्मे भारतीय; सीव्होटरचा सर्व्हे

भित्रा पाकिस्तान! अफवा पसरली, 'अज्ञात विमाने हवेत उडाली'; अख्ख्या कराचीची वीज घालवली

आजचे राशीभविष्य - 11 जून 2020; वृश्चिक राशीच्या लोकांनी स्त्रियांपासून जपावे

Web Title: Good News: Monsoon arrived in Maharashtra today on 11 Jun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.