उलट्या बोंबा! ५००० कोटींचा घोटाळा; छाप्यात लाखोंच्या पर्स खराब केल्याने भरपाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 10:17 AM2020-06-11T10:17:00+5:302020-06-11T10:18:42+5:30

मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रजाक यांच्यावर पैशांची अफरातफर, पदाचा दुरुपयोग, भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी घरावरील छाप्यात पोलिसांना त्यांच्या पत्नीकडे मोठे घबाड सापडले होते.

OMG! 5,000 crore scam; Demand for compensation for damaging millions of purses in the raid | उलट्या बोंबा! ५००० कोटींचा घोटाळा; छाप्यात लाखोंच्या पर्स खराब केल्याने भरपाईची मागणी

उलट्या बोंबा! ५००० कोटींचा घोटाळा; छाप्यात लाखोंच्या पर्स खराब केल्याने भरपाईची मागणी

Next

क्वालालंपूर : चोर तो चोर वर शिरजोर, या म्हणीचा प्रत्यय भारतात नाही तर मलेशियामध्ये आला आहे. मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रजाक यांच्यावर पैशांची अफरातफर, पदाचा दुरुपयोग, भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी घरावरील छाप्यात पोलिसांना त्यांच्या पत्नीकडे मोठे घबाड सापडले होते. यातील पर्स पोलिसांना नीट सांभाळता आल्या नसल्याचा आरोप त्यांच्या वकीलाने केला असून नुकसानभरपाई मागितली आहे. 


रजाक यांच्या वकीलाने न्यायालयामध्ये रोशमा मंसूर यांच्या किमती पर्स, हँडबॅग यांची देखभाल केली नाही. त्या खराब केल्याचा आरोप पोलिसांवर केला आहे. तसेच यासाठी सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली आहे. रजाक यांच्यावर ५००० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. बुधवारी क्वालालंपूर उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी सुनावणी झाली. नजीब यांचे वकील मोहम्मद शफी अब्दुल्ला यांनी बचावाच्या तयारीसाठी मलेशियाच्या केंद्रीय बँकमध्ये ठेवलेले जप्त साहित्य पाहण्याची परवानगी मागितली होती. 


यानंतर उच्च न्यायालयामध्ये त्यांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. पोलिसांनी मॅडमच्या किमती साहित्याप्रती काहीच काळजी घेतलेली नाही. त्यांनी साहित्या खराब केले आहे. त्यावर मार्करने नंबर लिहिले आहेत. अधिकाऱ्यांनी या मौल्यवान साहित्याबाबत निष्काळजीपणा दाखविला आहे. याची जबाबदारी सरकारची आहे. यामुळे सरकारने नुकसान भरून द्यावे, नवीन साहित्य आणून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने यावर काही निर्णय दिलेला नाही. मात्र, सहआरोपी नजीबचे जवळचे नेता मुसा अमन यांना सोडले आहे. 


पर्स आणि ज्वेलरीची किंमत २००० कोटी
मलेशिया पोलिसांनी नजीब रजाक यांची करोडो रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. त्यांच्या ६ ठिकाण्यांवर छापा मारून ५ ट्रक साहित्य जप्त केले आहे. यामध्ये नजीब यांच्या पत्नीच्या 500 पर्स आणि 12000 दागिने आहेत. यांची किंमत जवळपास 2000 कोटी रुपये आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Rajyasabha Election: राजस्थानमध्ये काँग्रेस संकटात; अशोक गेहलोतांकडून आमदारांची बैठक

CoronaVirus धक्कादायक! उत्पन्नाशिवाय एक महिनाही जगू शकत नाहीत निम्मे भारतीय; सीव्होटरचा सर्व्हे

भित्रा पाकिस्तान! अफवा पसरली, 'अज्ञात विमाने हवेत उडाली'; अख्ख्या कराचीची वीज घालवली

आजचे राशीभविष्य - 11 जून 2020; वृश्चिक राशीच्या लोकांनी स्त्रियांपासून जपावे

Web Title: OMG! 5,000 crore scam; Demand for compensation for damaging millions of purses in the raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.