खूशखबर! म्हाडा काढणार ३ हजार घरांची लॉटरी; पुणे, पिंपरी, कोल्हापूर, सांगलीत मिळणार घरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 08:14 IST2026-02-11T08:12:33+5:302026-02-11T08:14:24+5:30

विजेत्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन पद्धतीने म्हाडाकडे रकमेचा भरणा करणे गरजेचे आहे.

Good news! MHADA will hold a lottery for 3 thousand houses; houses will be available in Pune, Pimpri, Kolhapur, Sangli | खूशखबर! म्हाडा काढणार ३ हजार घरांची लॉटरी; पुणे, पिंपरी, कोल्हापूर, सांगलीत मिळणार घरे

खूशखबर! म्हाडा काढणार ३ हजार घरांची लॉटरी; पुणे, पिंपरी, कोल्हापूर, सांगलीत मिळणार घरे

मुंबई - म्हाडाच्या लॉटरीची श्रृंखला पुढे सुरू ठेवत पुणे मंडळातर्फे येत्या मार्चमध्ये ३ हजार परवडणाऱ्या घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येईल. अशी घोषणा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.

म्हाडाचा विभागीय घटक पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील ४ हजार १८६ घरांच्या विक्रीसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात लॉटरी काढण्यात आली. म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे कार्यक्रमाला उपस्थित होते.

शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, शिरूर येथे ५७४ सदनिका व खराबवाडी येथे १९४ व्यापारी गाळे बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. ताथवडेचा फेज-१ प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे.  पुढील फेज-२ मधील ८० टक्के काम पूर्ण होऊन ७५० निवासी व अनिवासी गाळे लॉटरीत समाविष्ट असतील. २० टक्के सर्वसमावेशक योजनेतून काही घरे उपलब्ध होतील.

विजेत्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन पद्धतीने म्हाडाकडे रकमेचा भरणा करणे गरजेचे आहे. अर्जदारास विजेती सदनिका स्वीकारणे अथवा नाकारणे याबाबतचा निर्णय स्वीकृतीपत्रात दिलेल्या मुदतीत घ्यावा लागेल. काही विजयी उमेदवारांना प्रवर्गनिहाय कागदपत्रे सादर करण्याच्या अटीवर देकारपत्र देण्यात येईल. कागदपत्रे  ऑनलाइन पद्धतीने सादर केल्यानंतर देकारपत्राचे वितरण सोईस्कर होईल.- राहुल साकोरे, मुख्य अधिकारी, पुणे मंडळ, म्हाडा

अडीच वर्षात पुणे मंडळाने काढलेली ही सातवी लॉटरी असून मोठ्या प्रमाणात परवडणारी घर उपलब्ध करून दिली आहेत. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल  यांच्या प्रयत्नामुळे मंडळाला गृह बांधणीसाठी जमिनी उपलब्ध होत आहेत. यापुढे परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
अनिल वानखडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा 

Web Title : म्हाडा लॉटरी: पुणे, कोल्हापुर में 3,000 किफायती घरों की सौगात!

Web Summary : म्हाडा पुणे मार्च में पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापुर और सांगली में 3,000 किफायती घरों के लिए लॉटरी शुरू करेगा। शिरूर में घरों और खराबवाड़ी में वाणिज्यिक स्थानों सहित परियोजनाएँ चल रही हैं। ताथवडे परियोजना का फेज-2 जल्द ही पूरा होने वाला है।

Web Title : MHADA Lottery: 3,000 Affordable Homes Coming to Pune, Kolhapur!

Web Summary : MHADA Pune to launch lottery for 3,000 affordable homes in Pune, Pimpri-Chinchwad, Kolhapur, and Sangli in March. Projects are underway, including homes in Shirur and commercial spaces in Kharabwadi. Phase-2 of Tathawade project nearing completion will offer residential and non-residential units.