अतिसंवेदनशील भागातील पोलिसांसाठी ‘गुड न्यूज’; दीडपट वेतन अन् महागाई भत्ता मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 10:32 IST2022-10-04T10:32:26+5:302022-10-04T10:32:48+5:30
दसऱ्यापूर्वी ही गूड न्यूज ठरली.

अतिसंवेदनशील भागातील पोलिसांसाठी ‘गुड न्यूज’; दीडपट वेतन अन् महागाई भत्ता मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नक्षलग्रस्त गडचिरोली, अहेरी तसेच गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रातील कार्यरत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या वेतनाच्या दीडपट दराने वेतन आणि महागाई भत्ता मिळणार आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने सोमवारी हा निर्णय घेतला असून, दसऱ्यापूर्वी ही गूड न्यूज ठरली.
नक्षलग्रस्त अथवा अतिसंवेदनशील क्षेत्रात कर्तव्य बजावणे ही बाब मोठी जोखमेची आहे. प्रत्येक क्षणाला जीव मुठीत घेऊन पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था हाताळावी लागते. त्यामुळे त्यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव आहे.
‘त्या’ राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांना मिळणार लाभ
- राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या नक्षलग्रस्त गडचिरोली, अहेरी आणि गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत असतात.
- राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांनी कर्तव्य बजावलेल्या कालावधीतील वेतन, महागाई दीडपट देण्यात येणार आहे. मात्र, या भागात सामान्य प्रशासनाकडून नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना ही नियमावली लागू असणार नाही, असे शासनादेशात म्हटले आहे.