लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! डिसेंबरचा हप्ता केला ट्रान्सफर, आजपासून खात्यात पैसे जमा होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 10:04 IST2024-12-24T09:57:06+5:302024-12-24T10:04:54+5:30
Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता काही दिवसातच मिळणार आहे.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! डिसेंबरचा हप्ता केला ट्रान्सफर, आजपासून खात्यात पैसे जमा होणार
Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana ( Marathi News ) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. डिसेंबर महिन्याच्या हप्ता कधी जमा होणार या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसापूर्वीच अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हप्ता लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.
लढणे थांबविणार नाही, उद्धव ठाकरे यांची भूमिका; मुंबईत जानेवारीपासून शाखानिहाय बैठक
विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कमेत वाढ करुन २१०० रुपये करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान, आता सहावा हप्ता २१०० रुपये येणार की १५०० रुपये येणार या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता सहावा हप्ता हा १५०० रुपये प्रमाणेच येणार असल्याचे सांगितले जात आहे. जुलै ते नोव्हेंबरपर्यंत १५०० रुपयांप्रमाणे ७५०० रुपये महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. आता आजपासून डिसेंबर महिन्याचा हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नागपुरातील अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महिन्याचा हप्ता १५०० रुपयांप्रमाणेच जमा होणार असल्याची माहिती दिली होती. डिसेंबरचा हप्ता आजपासून वर्ग करण्यात येणार आहे. एका महिन्यासाठी लागणारी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. या महिन्यात दोन टप्प्यात महिलांना पैसे मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात २ कोटी ३५ लाख महिलांना १५०० रुपयांप्रमाणे जमा होणार आहेत. तर निवडणुकीआधी आलेल्या २५ लाख नवीन अर्जाची स्क्रुटिनी सुरू आहे, ती पूर्ण झाल्यानंतर या महिलांना हप्ता जमा होणार आहे.