प्रवासाला निघताय? या मार्गावर अनेक रेल्वेगाड्या धावतील उशिरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:03 IST2025-11-12T13:02:50+5:302025-11-12T13:03:08+5:30
South Raiway: दक्षिण रेल्वेकडून थोकूर-जोकाटेदरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी ‘प्री-एनआय ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. दुहेरीकरणाचे काम १२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार असल्याने या काळात काही गाड्या नियंत्रित, पुनर्नियोजित किंवा आंशिक रद्द करण्यात येतील, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.

प्रवासाला निघताय? या मार्गावर अनेक रेल्वेगाड्या धावतील उशिरा
नवी मुंबई : दक्षिण रेल्वेकडून थोकूर-जोकाटेदरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी ‘प्री-एनआय ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. दुहेरीकरणाचे काम १२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार असल्याने या काळात काही गाड्या नियंत्रित, पुनर्नियोजित किंवा आंशिक रद्द करण्यात येतील, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.
या ब्लॉकदरम्यान थोकूर आणि जोकाटे यार्ड परिसरात रुळांच्या कनेक्शन आणि नवीन पॉइंट्स बसविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. बदलेल्या वेळपत्रकानुसार १४ नोव्हेंबर रोजी सुटणाऱ्या बंगळुरू-कारवार (१६५९५), त्रिवेंद्रम उत्तर-भावनगर (१९२५९) व लोकमान्य टिळक-त्रिवेंद्रम (१६३४५) या गाड्या अनुक्रमे ८०, १५ आणि २० मिनिटांनी नियंत्रित राहतील. तसेच १५ नोव्हेंबर रोजी पोरबंदर-त्रिवेंद्रम उत्तर (२०९१०) गाडी २० मिनिटांनी नियंत्रित राहील, तर १६ नोव्हेंबर रोजी जामनगर-तिरुनेलवेली (१९५७८) गाडी ३० मिनिटांनी उशिराने धावेल. १७ नोव्हेंबर रोजी या जामनगर-तिरुनेलवेली गाडीला १०० मिनिटे उशीर होईल, तसेच बंगळुरू-कारवार गाडीला २० मिनिटांचा उशीर होईल.
१८ नोव्हेंबर रोजी कोइम्बतूर-जबलपूर (०२१९७) आणि एर्नाकुलम-पुणे (११०९८) या गाड्या अनुक्रमे रात्री ८:०५ व ९:५० वाजता तीन तास उशिराने सुटतील. या दिवशी इतर काही गाड्या १५ ते १५० मिनिटे नियंत्रित राहतील. २३ नोव्हेंबर रोजी मुंबई सीएसएमटी-मंगळूर (१२१३३) गाडी सुरतकल येथेच थांबवून पुढे रद्द केली जाईल, तर उलट दिशेची १२१३४ मंगळूर-मुंबई गाडी सुरतकलहून सुरू होईल. तसेच मुरुडेश्वर-बंगळुरू (१६५८६) आणि पुणे-एर्नाकुलम (११०९७) या गाड्याही अनुक्रमे १२० व ५० मिनिटांनी उशिरा धावतील.