शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

देवाघरी गेली सारी फुले! मुलांच्या आठवणीने शिक्षक गहिवरले

By admin | Updated: August 1, 2014 04:11 IST

जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला...’ ही कविता मानसी मच्छिंद्र झांजरे ही सहावीतील चिमुरडी अतिशय सुंदर म्हणायची.

माळीण (जि. पुणे) : ‘जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला...’ ही कविता मानसी मच्छिंद्र झांजरे ही सहावीतील चिमुरडी अतिशय सुंदर म्हणायची. तिचा आवज अतिशय गोड होता. संगीत, कवायतीमध्ये ती नेहमी पुढे असायची. इतकी चुणचुणीत मुलगी आता दिसणार नाही, असे म्हणताना माळीण गावचे माजी मुख्याध्यापक वि.भा. गबाले यांना गहिवरून आले. मुले म्हणजे देवाघरची फुले म्हणतात, माळीण गावातील ३० ते ३५ मुले बुधवारच्या दुर्घटनेने खरोखरच देवाघरची फुले झालीमाळीण गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. येथे इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग आहे. शाळेचा पट ७२ आहे. यातील ३५ मुले गावातीलच आहे. बहुतांश मुले ही इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत म्हणजे १० ते ११ वर्षे वयाची होती. बुधवारच्या दुर्घटनेत जवळपास सर्व मुले बेपत्ता आहेत. डोंगर कोसळला त्यावेळी बहुतांश लहान मुले ही घरातच होती. अनेकांवर झोपेतच काळाने घाला घातला. गावात भेटणारा प्रत्येक जण या मुलांच्या आठवणीने गहिवरून येत होता. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश रोंगटे यांच्या डोळ्यासमोर तर प्रत्येक मुलाचा चेहराच बुधवारपासून फिरतो आहे. ते म्हणाले, गावातील ग्रामस्थ शाळेबाबतच्या कोणत्याही उपक्रमासाठी अतिशय अग्रेसर असायची. आठच दिवसांपूर्वी गावच्या फंडातून ई-लर्निंगसाठी ३० हजार रुपये दिले होते. गावातील तरुण मंडळी नेहमी शाळेला सहकार्य करण्यास तत्पर असायची. जीवाला जीव देणारे लोक होते. सुप्रिया गोरक्ष पोटे या सहावीतील मुलीचा चेहरा आठवला की अजूनही गहिवरून येते. अत्यंत चुणचुणीत असलेल्या सुप्रियाचा शिष्यवृत्तीमध्ये प्रथम क्रमांक आला होता. तिचे वडील पुण्यामध्ये पोलीस दलात होते. सुट्टी काढून ते भातलावणीसाठी घरी आले होते. मंदिराच्या मागच्या बाजुला त्यांचे घर होते. आज तेथे फक्त मातीचा ढिगारा आहे. बापलेक दोघेही मातीखाली गडप झाले आहेत, अशी वेदना त्यांनी व्यक्त केली. भारती पोटे आणि तान्हुबाई पोटे या गावातील महिला माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत मुलांसाठी खिचडी करायच्या. दररोज त्यांची शाळेला भेट असायची. आज त्या दोघीही नाहीत आणि त्यांची आवडती मुलेही नाहीत, असे सांगताना गबाले यांचा कंठ दाटला.