शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई क्रिकेटचा विस्तार हेच ध्येय

By admin | Updated: June 14, 2015 01:50 IST

क्रिकेटकडे पाहायचा आमचा दृष्टीकोन अत्यंत वेगळा असून मुंबई क्रिकेटचा स्तर आणखी वाढवण्याचा आमचा प्रयत्न यापुढेही राहिल.

मुंबई : क्रिकेटकडे पाहायचा आमचा दृष्टीकोन अत्यंत वेगळा असून मुंबई क्रिकेटचा स्तर आणखी वाढवण्याचा आमचा प्रयत्न यापुढेही राहिल. आपण सर्व मिळून मुंबई क्रिकेटमध्ये मोठे योगदान देऊ, असा विश्वास मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) अध्यक्षपदाची निवडणूक लढवित असलेले शरद पवार यांनी केलेशनिवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व एमसीएतील सत्ताधारी पवार - म्हाडदळकर गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या गटाची भूमिका मांडली. उमेदवारांची माहिती देताना प्रत्येकावर देण्यात आलेल्या जबाबदारींची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली. मी अणि उपाध्यध्यक्षपदासाठी उभे असलेले आमदार आशीष शेलार हे खेळाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या उपक्रमांवर निर्णय घेतील. राज्य सरकारकडून आवश्यक त्या परवानगी घेण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू. त्याचवेळी खेळाडू व त्यांच्या समस्या याबाबत माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर व इतर सदस्य निर्णय घेतील. यामुळेच आमचा गट समतोल असून मुंबई क्रिकेटच्या अधिक विस्तारासाठी आम्ही सज्ज आहोत, असे पवार म्हणाले.एकूणच, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर झालेल्या या पहिल्या कार्यक्रमातून पवार - म्हाडदळकर गटाने जोमाने ‘बोलंदाजी’ करून निवडणुकीमध्ये विजय आपलाच होईल, असा विश्वास व्यक्त केला. (क्रीडा प्रतिनिधी)अध्यक्षपदासाठीचे प्रतिस्पर्धी क्रिकेट फर्स्ट गटाचे ‘कर्णधार’ विजय पाटील यांच्यावर देखील पवार यांनी टीका केली. ते म्हणाले, डीवाय पाटील स्टेडियमवर एमसीए आंतरराष्ट्रीय सामने होऊ देत नाही, असे पाटील यांचे म्हणणे आहे. पण याबाबत मी सांगू इच्छितो की, आंतरराष्ट्रीय सामने आयोजनासाठी बीसीसीआय सोबतच आयसीसीची मान्यता असणे आवश्यक असते. अशी मान्यता केवळ वानखेडे व सीसीआयला असताना, हे सामने डीवायवर कसे खेळवता येतील, असा सवाल पवार यांनी केला.मुंबई क्रिकेटमध्ये शालेय व कॉलेजस्तरचे क्रिकेट अत्यंत महत्त्वाचे असून त्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे. मैदानावरच्या सुविधांवर देखील लक्ष देणे गरजेचे आहे. पवार - म्हाडदळकर गट यासाठीच आतापर्यत कार्य केले आहे.- दिलीप वेंगसरकर, माजी कसोटीपटू