शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

राज्यातील रेशन व्यवस्था ‘गो लाइव्ह’! काळाबाजारीवर नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 5:38 PM

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील ‘पॉस’ मशीन बसविण्यात आलेली राज्यातील सर्व रेशन दुकाने ‘गो लाइव्ह’ घोषित करण्यात आली आहेत. अर्थात संबंधित रेशन दुकानदाराकडून किती लाभार्थ्यांना धान्य उचल केली, ती कोणत्या प्रमाणात केली, याबाबतची ‘लाइव्ह’ माहिती पुरवठा कार्यालयाकडे उपलब्ध असेल.

अमरावती : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील ‘पॉस’ मशीन बसविण्यात आलेली राज्यातील सर्व रेशन दुकाने ‘गो लाइव्ह’ घोषित करण्यात आली आहेत. अर्थात संबंधित रेशन दुकानदाराकडून किती लाभार्थ्यांना धान्य उचल केली, ती कोणत्या प्रमाणात केली, याबाबतची ‘लाइव्ह’ माहिती पुरवठा कार्यालयाकडे उपलब्ध असेल.

लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्प अंतर्गत रास्त भाव दुकानातील शिधावस्तूंचे वितरण करताना लाभार्थींची बायोमेट्रिक ओळख पटवून पॉइंट आॅफ सेल डिव्हाइस (पॉस) द्वारे शिधावस्तू वितरण केल्या जात आहेत. १८ मे २०१६ पासून पॉस मशीन कार्यान्वित करण्याचे आदेश जारी करण्यात आले.

नियमानुसार सर्व रास्त भाव दुकानातून किमान १० ट्रान्झॅक्शन होणे ‘गो लाइव्ह’करिता आवश्यक आहे. आता राज्यातील रेशन दुकानात ९९ टक्क्यांपेक्षा जास्त पॉस उपकरणे लाइव्ह करण्यात आल्याने ही रास्त भाव दुकाने ‘गो लाइव्ह’ घोषित करण्यात आली आहेत.रास्त भाव दुकानात पॉस उपकरणे बसविण्यासाठी रास्त भाव दुकानांची कोकण-नाशिक, पुणे-औरंगाबाद व अमरावती-नागपूर या तीन गटांत विभागणी करण्यात आली. या तिन्ही गटातील रेशन दुकानातील शिधावस्तूंचे वितरण आता पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावर ‘लाइव्ह’ पाहता येतील. 

पॉस उपकरणे बसविण्यात आलेली रास्त भाव दुकाने ‘गो लाइव्ह’ घोषित करण्यात आली आहे. सर्व रास्त भाव दुकानातून किमान १० ट्रान्झॅक्शन ‘गो लाइव्ह’साठी अनिवार्य आहे.- कि. गो. ठोसरअवर सचिव, अन्न नागरी पुरवठा विभाग

टॅग्स :digitalडिजिटल