राज्यातील रेशन व्यवस्था ‘गो लाइव्ह’! काळाबाजारीवर नियंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 18:45 IST2018-01-04T17:38:03+5:302018-01-04T18:45:25+5:30
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील ‘पॉस’ मशीन बसविण्यात आलेली राज्यातील सर्व रेशन दुकाने ‘गो लाइव्ह’ घोषित करण्यात आली आहेत. अर्थात संबंधित रेशन दुकानदाराकडून किती लाभार्थ्यांना धान्य उचल केली, ती कोणत्या प्रमाणात केली, याबाबतची ‘लाइव्ह’ माहिती पुरवठा कार्यालयाकडे उपलब्ध असेल.

राज्यातील रेशन व्यवस्था ‘गो लाइव्ह’! काळाबाजारीवर नियंत्रण
अमरावती : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील ‘पॉस’ मशीन बसविण्यात आलेली राज्यातील सर्व रेशन दुकाने ‘गो लाइव्ह’ घोषित करण्यात आली आहेत. अर्थात संबंधित रेशन दुकानदाराकडून किती लाभार्थ्यांना धान्य उचल केली, ती कोणत्या प्रमाणात केली, याबाबतची ‘लाइव्ह’ माहिती पुरवठा कार्यालयाकडे उपलब्ध असेल.
लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्प अंतर्गत रास्त भाव दुकानातील शिधावस्तूंचे वितरण करताना लाभार्थींची बायोमेट्रिक ओळख पटवून पॉइंट आॅफ सेल डिव्हाइस (पॉस) द्वारे शिधावस्तू वितरण केल्या जात आहेत. १८ मे २०१६ पासून पॉस मशीन कार्यान्वित करण्याचे आदेश जारी करण्यात आले.
नियमानुसार सर्व रास्त भाव दुकानातून किमान १० ट्रान्झॅक्शन होणे ‘गो लाइव्ह’करिता आवश्यक आहे. आता राज्यातील रेशन दुकानात ९९ टक्क्यांपेक्षा जास्त पॉस उपकरणे लाइव्ह करण्यात आल्याने ही रास्त भाव दुकाने ‘गो लाइव्ह’ घोषित करण्यात आली आहेत.
रास्त भाव दुकानात पॉस उपकरणे बसविण्यासाठी रास्त भाव दुकानांची कोकण-नाशिक, पुणे-औरंगाबाद व अमरावती-नागपूर या तीन गटांत विभागणी करण्यात आली. या तिन्ही गटातील रेशन दुकानातील शिधावस्तूंचे वितरण आता पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावर ‘लाइव्ह’ पाहता येतील.
पॉस उपकरणे बसविण्यात आलेली रास्त भाव दुकाने ‘गो लाइव्ह’ घोषित करण्यात आली आहे. सर्व रास्त भाव दुकानातून किमान १० ट्रान्झॅक्शन ‘गो लाइव्ह’साठी अनिवार्य आहे.
- कि. गो. ठोसर
अवर सचिव, अन्न नागरी पुरवठा विभाग