शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर चालवला जातोय 'गो राज्यपाल' हा हॅशटॅग; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा आहे 'आशीर्वाद'  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 19:09 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तर 'हे राज्यपाल नकोत' अशी जाहीर भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रपती व पंतप्रधान यांनाही पत्र पाठवून राज्यपालांना परत बोलवा अशी मागणी

पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षाच्या विद्यार्थी संघटनांनी समाजमाध्यमावरून मोहिम सुरू केली आहे. त्यांच्या या मोहिमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या निवडीसंदर्भात राज्यपालांनी घेतलेल्या ठाम भूमिकेवरून हे राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे.  

काँग्रेसच्या एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेने समाजमाध्यमांवरून 'गो राज्यपाल' हा हॅश टॅग चालवला आहे. संघटनेच्या वतीने राष्ट्रपती व पंतप्रधान यांनाही पत्र पाठवून राज्यपालांना परत बोलवा अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाचे संकट वाढत आहे. सरकारने त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याला राज्यपाल विरोध करत आहे.

हे घटनाविरोधी असून राज्यातील तरूणाईला संकटात टाकणारे आहे असे एनएसयूआय चे म्हणणे आहे. राज्य उपाध्यक्ष भूषण रानभेरी याबाबत बोलताना म्हणाले, मंत्री मंडळाने घेतलेल्या निर्णयाला राज्यपाल तेव्हाच विरोध करू शकतात जेव्हा तो घटनेच्या विरोधात असेल. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय तसा नाही. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ते घेण्यात आला आहे. कोरोना अजूनही हद्दपार झालेला नाही. त्याची तीव्रता वाढतेच आहे. अशा स्थितीत  पक्षा घेण्याचा आग्रह धरणे, मंत्री मंडळाला थेट विरोध करणे या गोष्टी अयोग्य आहेत. त्यामुळेच आम्ही गो कोश्यारी अशी मोहिम राबवत आहोत.  

राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भूषण रानभेरी यांनीही अशीच भूमिका मांडली.  राज्यपाल विनाकारण आक्रमक भूमिका घेत आहेत असे ते म्हणाले. मंत्री मंडळाने विचार करूनच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेसाठी गर्दी होणार, त्यातून संसर्ग होणार, तो वाढणार अशा अनेक गोष्टी आहेत. त्यातच तासिका झालेल्या नाहीत, अभ्यासक्रम पुर्ण नाही अशा स्थितीत परीक्षा घेणे योग्य नाही. तरीही राज्यपाल म्हणतात परीक्षा घ्यावी किंवा न घ्यावी हा माझा अधिकार आहे. असे म्हणणे म्हणजे मंत्री मंडळाला विरोध करणेच आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी 'हे राज्यपाल नकोत' अशी जाहीर भूमिका घेतली. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचेही तेच म्हणणे आहे.  

दरम्यान. राज्यपालांना विरोध करण्यासाठी विद्यार्थी संघटनांना चिडवून देण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यपालांना विधानपरिषदेत १२ जागा नियुक्त करण्याचा अधिकार आहे. सरकारने त्यांना यासाठी नावे सुचवायची असतात. कला, साहित्य, विज्ञान, समाजकार्य असे काही निकष त्यासाठी आहेत. ते डावलून प्रत्येक वेळी सरकारकडून राजकीय नियुक्त्या केल्या जातात. विद्यमान राज्यपालांनी असे करण्याला ठाम नकार दिला आहे. १५ जूनला या गटातील विद्यमान २ सदस्यांची मुदत पुर्ण होऊन सर्व म्हणजे १२ जागा रिक्त होत आहेत. त्यावरच्या नेमणूका हेच कारण राज्यपालांना विरोध करण्यामागे असल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :Puneपुणेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाState Governmentराज्य सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी