एकाच कुटुंबातील ६ जणांवर काळाचा घाला
By Admin | Updated: June 10, 2016 04:59 IST2016-06-10T04:59:24+5:302016-06-10T04:59:24+5:30
तीर्थक्षेत्राहून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या आॅटोला तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दिलेल्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील ६ जण ठार

एकाच कुटुंबातील ६ जणांवर काळाचा घाला
नांदेड : धर्माबाद नजीकच्या बासर तीर्थक्षेत्राहून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या आॅटोला तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दिलेल्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील ६ जण ठार झाले. या अपघातात एक गरोदर महिला गंभीर जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांकडून मिळाली.
निजामाबाद येथील आदर्श नगरातील भाविक आॅटोने बासर येथे दर्शनासाठी बुधवारी सायंकाळी आले होते. दर्शनानंतर ते गावी परतत असताना बासर तीर्थक्षेत्रापासून १५ किमी अंतरावरील मिट्टापूर गावानजीक हा अपघात झाला. यात गणेश (१८), सतीश (२६), रुचिका (१९), गंगोत्री (८), स्वाती (६) व अन्य एकाचा मृत्यू झाल्याची माहिती निजामाबाद पोलीस ठाण्यातून देण्यात आली. (प्रतिनिधी)