शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

साखर उद्योगाला दहा कोटींचे सॉफ्टलोन तातडीने द्या: अमित शहा यांची घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 9:12 PM

सध्या अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाने हा हंगाम सुरू होण्यापूर्वी या उद्योगास १० हजार कोटी रुपयांचे सॉफ्टलोन द्यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे शुक्रवारी केली. त्यांनी साखर उद्योगाच्या सर्व प्रश्नांची माहिती घेतली असून, त्यावर संबंधित मंत्रिगट समूहासमोर हे प्रश्न मांडून मदत केली जाईल, असे आश्वासन शहा यांनी दिले.

ठळक मुद्देसाखर उद्योगाला दहा कोटींचे सॉफ्टलोन तातडीने द्याभाजपच्या शिष्टमंडळांची मागणी : अमित शहा यांची घेतली भेट

कोल्हापूर : सध्या अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाने हा हंगाम सुरू होण्यापूर्वी या उद्योगास १० हजार कोटी रुपयांचे सॉफ्टलोन द्यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे शुक्रवारी केली. त्यांनी साखर उद्योगाच्या सर्व प्रश्नांची माहिती घेतली असून, त्यावर संबंधित मंत्रिगट समूहासमोर हे प्रश्न मांडून मदत केली जाईल, असे आश्वासन शहा यांनी दिले.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार विनय कोरे, माजी खासदार धनजंय महाडिक, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आदी सहभागी झाले. बैठकीतील चर्चेची माहिती माजी खासदार महाडिक यांनी ह्यलोकमतह्णला दिली. साखर उद्योग गतवर्षी दुष्काळ, त्यानंतर महापूर आणि यावर्षी कोरोनाच्या संकटात सापडला आहे. त्यामुळे एफआरपीपासून कामगारांचे पगार देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नाहीत. त्यासाठी केंद्र शासनाने या उद्योगाला भरीव मदत करण्याची गरज आहे, हे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.

शहा यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. या मागण्यांचे निवेदन केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि रामविलास पासवान यांनाही देणार आहोत. केंद्र सरकारकडून साखर उद्योगांसाठी काही चांगले निर्णय लवकरच घेतले जातील, अशी आशा असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेटीनंतर दिली.

प्रमुख मागण्या अशा

  1. साखर उद्योगाला केंद्र शासनाने आतापर्यंत एफआरपी देण्यासाठी तीन कर्जे दिली आहेत. त्यातील एक फिटले असून, अजून दोन कर्जांचे हप्ते आता सुरू आहेत. या कर्जांची पुर्नरचना केल्यास कर्ज फेडण्यास अवधी मिळेल. शिवाय हप्ते थांबतील व तेवढी रक्कम कारखान्यांनकडे तरलता म्हणून उपलब्ध होईल. त्यासाठी केंद्र शासनाने रिझर्व्ह बँकेस सूचना द्याव्यात.
  2. अडचणीतील उद्योगाल सावरण्यासाठी १० हजार कोटी रुपयांचे नव्याने सॉफ्टलोन द्यावे. ही रक्कम उपलब्ध झाल्यास थकीत एफआरपी, कामगारांचे थकीत पगार देणे शक्य होईल.
  3. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर पॅकेजमध्ये साखर उद्योगाचा समावेश नाही. तो केल्यास लघुउद्योगास जसा वीस टक्के वाटा मिळाला तसाच साखर उद्योगालाही मिळू शकेल.
  4.  केंद्राने पेट्रोलियम कंपन्यांशी बोलून पुढील दहा वर्षांसाठी इथेनॉलचे धोरण निश्चित करावे. या कंपन्यांनी कारखानदारीस इथेनॉल घेण्याची हमी दिल्याशिवाय हा उद्योग वाढीस लागणार नाही आणि बँकांही कर्ज उपलब्ध करून देणार नाहीत. सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल वापरण्यास परवानगी दिली असली तरी सध्या ५ टक्केच वापर सुरू आहे. उसापासून थेट इथेनॉल करायचे झाल्यास त्याबाबतचे धोरण स्पष्ट हवे.

 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाAmit Shahअमित शहा