मिस्ड कॉल द्या, मुख्यमंत्री सहायता निधी मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 13:29 IST2023-05-20T13:28:30+5:302023-05-20T13:29:24+5:30

अर्ज कुठे मिळतो, तो कसा भरायचा किंवा तो मुख्यमंत्री कार्यालयातूनच घ्यावा का, अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात आहेत.

Give Missed Call, Get Chief Minister Aid Fund | मिस्ड कॉल द्या, मुख्यमंत्री सहायता निधी मिळवा

मिस्ड कॉल द्या, मुख्यमंत्री सहायता निधी मिळवा


मुंबई : विविध आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाते. यासाठीचा अर्ज कुठे मिळतो, तो कसा भरायचा किंवा तो मुख्यमंत्री कार्यालयातूनच घ्यावा का, अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात आहेत. यावर तोडगा काढण्यात आला असून फक्त एका मिस्ड कॉलवर आता हा निधी मिळणे शक्य होणार आहे. 

यासाठी ८६५०५६७५६७ हा मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मिस्ड कॉल देताच तत्काळ मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज आपल्या मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. 

Web Title: Give Missed Call, Get Chief Minister Aid Fund