शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 23:15 IST

धनंजय मुंडे यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar On Dhananjay Munde Request: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना धनंजय मुंडे यांनी आरोग्यविषयक समस्यांचे कारण दिलं होतं. मात्र आता धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून पक्षश्रेष्ठींना आपल्याला रिकामे न ठेवता काहीतरी जबाबदारी देण्याची विनंती केली आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या विनंतीवरुन राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दुसरीकडे पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

वाल्मीक कराडच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागल्यानंतर आता धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रि‍पदाचे वेध लागले आहेत. धनंजय मुंडे यांनी कर्जतमधील एका कार्यक्रमात बोलताना यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोरच मोठी मागणी केली. मला रिकामं ठेवू नका. एखादी जबाबदारी द्या, अशी विनंती धनंजय मुंडेंनी केली. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या मागणीवर मोजक्या शब्दात सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

धनंजय मुंडे यांच्या विनंतीचा मान केला जाईल, त्यांच्या सूचनांचे पालन केले जाईल अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. त्यामुळे आता धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात दिसणार की त्यांच्याकडे अन्य कोणती जबाबदारी सोपवली जाणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

"माझी सुनील तटकरे यांना विनंती आहे की त्यांनी कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. आम्ही चुकलो तर आमचे कान धरावे. चुकलो नाही तर चांगलंच आहे. पण आता रिकामं ठेवू नका. जबाबदाऱ्या द्या एवढीच मी त्यांना विनंती करतो," असं धनंजय मुंडे म्हणाले.  धनंजय मुंडेंना देण्यासाठी माझ्याकडे एक काम आहे - छगन भुजबळ

"धनंजय मुंडे यांच्या मागणीचा पक्ष जरूर विचार करेल. तोवर मी एवढंच सांगेन की आपल्याकडे एक काम आहे. बाकीच्या जबाबदाऱ्यांचं अजित पवार पाहतील. पण, आपल्याकडे ओबीसी आरक्षणाचं काम आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे ओबीसी आरक्षणाचं काम करत होते, त्यापैकी बरंच काम बाकी आहे. धनंजय मुंडे हे या ओबीसी आरक्षणाच्या लढाईत सहभागी झाले तर बरं होईल. यामुळे गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न देखील पूर्ण होईल," असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेस