शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
3
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
4
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
5
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
6
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
7
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
8
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
9
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
10
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
11
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
12
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
13
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
14
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
15
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
16
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
17
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
18
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
19
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
20
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका

महिलांसाठी फर्स्ट क्लासचा पूर्ण डबा द्या! उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 6:53 AM

सर्व उपनगरीय लोकलमध्ये महिलांसाठी स्वतंत्र फर्स्ट क्लासचा डबा ठेवण्याचा विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला गुरुवारी केली.

मुंबई : सर्व उपनगरीय लोकलमध्ये महिलांसाठी स्वतंत्र फर्स्ट क्लासचा डबा ठेवण्याचा विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला गुरुवारी केली. सध्या महिलांसाठी उपलब्ध असलेल्या फर्स्ट क्लासच्या डब्यात केवळ १४ आसन क्षमता आहे. सकाळी व संध्याकाळी या डब्यात खूप गर्दी होते. मात्र, महिलांच्या तुलनेत पुरुषांचा फर्स्ट क्लासचा डबा मोठा असल्याची तक्रार एका महिला वकिलाने एका याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाला केली. त्यावर ‘रेल्वे एक संपूर्ण डबा महिला फर्स्ट क्लाससाठी का देत नाही? एकामहिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर असा डबा देऊन बघा. गर्दी कमी आहे, असे वाटले तर पुन्हा आताचा डबा ठेवा,’ अशी सूचना न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने रेल्वे प्रशासनाला केली. रेल्वेसंबंधित काहीही दुर्घटना झाल्या तर त्याचा जास्त त्रासपुरुषांपेक्षा महिला प्रवाशांना होतो, असे निरीक्षणही न्यायालयाने या वेळी नोंदविले.एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी प्रकरणी उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने ३ जुलै रोजी झालेल्या गोखले पूल दुर्घटनेचा उल्लेख केला. जुन्या पुलांचे वेळोवेळी आॅडिट केले, तर अशा दुर्घटना होणार नाहीत. त्यामुळे रेल्वेने सर्व जुन्या पुलांचे आॅडिट करावे, असे निर्देश न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले. वाढती लोकसंख्या मुंबईतीलदळणवळणावर अतिरिक्त भार टाकत आहे. मुंबईचा कितीही विकास झाला तरी दळणवळण तेच राहणार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.स्थानकांतून फेरीवाल्यांना हटवाफेरीवाल्यांना रेल्वे स्थानकांवरील पुलांवरून व परिसरातून हटविण्याचा स्पष्ट आदेश असतानाही बऱ्याच रेल्वे स्थानकांवर व परिसरात फेरीवाले बसत असल्याची तक्रार एका वकिलाने न्यायालयात केली. त्यावर न्यायालयाने महापालिका व रेल्वेला फेरीवाल्यांना हटविण्यासाठी मोहीम राबविण्याची सूचना केली.प्रशासनाने भविष्यातील मागण्यांचा विचार करून विकास केला पाहिजे. मुंबईला लाभलेल्या समुद्रकिना-याचा फायदा प्रशासन का घेत नाही? सरकारने याचा विचार करावा, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलWomenमहिला