पुणे(शेलपिंपळगाव) : राज्यपाल नियुक्त खेळाडू कोट्यातून अर्जुन पुरस्कार विजेते पै. काका पवार यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी अशी मागणी कुस्तीक्षेत्रातील तमाम पैलवान मंडळींकडून केली जात आहे. यापार्श्वभूमीवर रोहा (रायगड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा जेष्ठ नेते शरद पवार यांची काका पवारांनी भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्या समवेत महाराष्ट्र केसरी पै. दत्ता गायकवाड, महान महाराष्ट्र केसरी पै. दिलीप भरणे, आशियाई सुवर्णपदक विजेते पै. रवींद्र पाटील उपस्थित होते. महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रात काका पवार हे नाव अगदीच चर्चेत आहे. ज्या महाराष्ट्रात शे - दीडशे किलो वजन, सहा सव्वासहा फूट उंच असणाऱ्या व्यक्तीलाच पैलवान म्हणावे, अशी प्रथा होती. त्या महाराष्ट्रात ५० - ५५ वजनाचा माणूस सुद्धा पैलवान होऊ शकतो आणि देशाचा झेंडा सातासमुद्रापार फडकवू शकतो असा इतिहास काका पवारांनी रचला आहे. गोकुळ वस्ताद तालमीत हरिश्चंद्र बिराजदारांच्या मार्गदर्शनाखाली काका पवार एशियाड कुस्ती स्पर्धेत खेळले असून राष्ट्रकुल सारख्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत. ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात देशाला तब्बल ३२ पदके मिळवून त्यांनी इतिहास रचला आहे. काकांच्या यशस्वी खेळाबद्दल केंद्र सरकारने "अर्जुन पुरस्कार" देऊन त्यांचा गौरव केला आहे.
'अर्जुनवीर' काका पवारांना विधानपरिषदेवर संधी द्या; शरद पवारांकडे पैलवान मंडळींची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 14:17 IST
काकांना विधानपरिषदेवर संधी दिल्यास कुस्तीसह क्रीडा क्षेत्रातील अनेक अडचणी शासन दरबारी मांडल्या जातील.
'अर्जुनवीर' काका पवारांना विधानपरिषदेवर संधी द्या; शरद पवारांकडे पैलवान मंडळींची मागणी
ठळक मुद्दे महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रात काका पवार हे नाव चर्चेत