राजस्थानात विकलेल्या युवतीला नागपुरात आणले
By Admin | Updated: July 17, 2016 05:12 IST2016-07-17T05:12:34+5:302016-07-17T05:12:34+5:30
राजस्थानमध्ये दीड लाखात विकलेल्या युवतीला नागपुरात परत आणण्यात शांतीनगर पोलिसांनी यश मिळवले. विशेष म्हणजे, यावेळी पोलिसांसोबत आरोपींची सिनेस्टाईल चकमक झाली.

राजस्थानात विकलेल्या युवतीला नागपुरात आणले
नागपूर : राजस्थानमध्ये दीड लाखात विकलेल्या युवतीला नागपुरात परत आणण्यात शांतीनगर पोलिसांनी यश मिळवले. विशेष म्हणजे, यावेळी पोलिसांसोबत आरोपींची सिनेस्टाईल चकमक झाली. २२ जूनला या युवतीचे अपहरण करून आरोपींनी तिला राजस्थानमधील बारा जिल्ह्यात (रतवड ग्राम) दीड लाखात विकले होते. तिला विकणारे आरोपी परत आल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. शांतीनगर पोलिसांचे पथक मुलीच्या शोधासाठी रतवडला गेल्यानंतर आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी पोलिसांना घेराव घातला. तेथे सिनेस्टाईल हाणामारीही झाली. मात्र, पोलिसांनी युवतीला ताब्यात घेत आज सायंकाळी नागपुरात आणले.