शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

मानपूर इथली वादग्रस्त जमीन परत करणार- गिरीश महाजन

By admin | Updated: June 16, 2016 20:06 IST

मी कोणाचीही जमीन हडपलेली नाही. ती जमीन मी आतापर्यंत पाहिली नसल्याचा खळबळजनक दावा गिरीश महाजनांनी केला.

 ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 16-  मानपूर इथे साखर कारखान्यासाठी खरेदी करण्यात आलेली वादग्रस्त जमीन परत करणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत दिली. मी कोणाचीही जमीन हडपलेली नाही. ती जमीन मी आतापर्यंत पाहिली नसल्याचा खळबळजनक दावा गिरीश महाजनांनी केला. जमीन माझ्या नावे होती हे माहीत नव्हतं. जमिनीबाबत एकनाथ खडसेंकडून समजल्याचंही यावेळी गिरीश महाजनांनी सांगितलं आहे. या जमिनीवरून महाजन यांच्यावर सध्या टीका सुरू आहे. त्या संदर्भात त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही जमीन आपल्या मालकीची नाही तर सार्वजनिक म्हणजेच साखर कारखान्यासाठी घेतली होती. कारखाना सुरू नसल्याने ती वापराविना पडून होती. आपल्याला याची कल्पनाही नव्हती. आता मात्र जमिनीच्या मूळ मालकांना ही जमीन परत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
भुसावळ तालुक्यातील मानपूर गावातील पाच एकर जमीन कवडीमोल भावानं गिरीश महाजनांनी 2002 मध्ये कारखान्यासाठी खरेदी केली होती. मात्र या जमिनीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात न केल्याने महाजनांनी निवडणूक अटींचा भंग केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. या कारखान्यात शेतकऱ्यांना नोकरी देऊ, असं आश्वासन ही जमीन खरेदी करताना गिरीश महाजनांनी दिलं होतं. पण प्रत्यक्षात मागील 16 वर्षांत या पाच एकर जमिनीवर ना कारखाना उभा राहिला, ना शेतकऱ्यांना रोजगार मिळाला, असं समोर आलं आहे. 
या जमीन खरेदीत फसवणूक झाल्याची भावना तिथल्या शेतक-यांमध्ये असून,  ही जमीन  परत करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, गिरीश महाजन यांनी सर्व आरोप फेटाळत ही जमीन शेतकऱ्यांना परत देण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं.