शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

काळ्याबाजारावर टाच आल्याने योजनाच बंद पाडण्याचा डाव - गिरीश बापट

By अतुल कुलकर्णी | Updated: April 21, 2018 01:03 IST

रेशन दुकानातील ई-पॉस मशीनमुळे १० लाखांहून अधिक शिधापत्रिका बोगस आढळून आल्या, तर रेशन दुकानदारांनी ३८ हजार मे. टन धान्य कमी उचलले. या यंत्रणेमुळे रेशन दुकानातील धान्यांच्या काळ्याबाजारावर टाच आणल्यामुळे धाबे दणाणलेल्या दुकानदारांनी ही यंत्रणाच मोडून काढण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.

मुंबई : रेशन दुकानातील ई-पॉस मशीनमुळे १० लाखांहून अधिक शिधापत्रिका बोगस आढळून आल्या, तर रेशन दुकानदारांनी ३८ हजार मे. टन धान्य कमी उचलले. या यंत्रणेमुळे रेशन दुकानातील धान्यांच्या काळ्याबाजारावर टाच आणल्यामुळे धाबे दणाणलेल्या दुकानदारांनी ही यंत्रणाच मोडून काढण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.नव्या यंत्रणेमुळे गोरगरिबांच्या घरात जाणारे धान्य काळ्या बाजारात विकता येईना म्हणून रेशन दुकानदारांनी राजकीय पक्षांना हाताशी धरून आंदोलन सुरू केले आहे. जे लोक ई-पॉस मशीन परत करतील त्यांच्या दुकानाचे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.नुकताच मुंबई, ठाण्यातील काही रेशन दुकानदारांनी मोर्चा काढून ई-पॉस मशीन परत केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षातएकही मशीन परत आलेले नाही, असे सांगून बापट म्हणाले, सर्वाेच्च न्यायालयाने स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण करण्यासाठी ‘आधार’चा आधार घेण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्याने नोटिफिकेशनही काढले आहे. तरीही जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवली जात असल्याचे बापट म्हणाले.अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या ७ कोटी लाभार्थ्यांपैकी ८७ टक्के लाभार्थ्यांचे आधार सिडींग करण्यात आले आहे. तर १०० टक्के शिधापत्रिकांचे डिजिटायझेशन झाले आहे. राज्यात एकूण ५२,३८१ रास्तभाव दुकानांमध्ये मायक्रो एटीएम दर्जाच्या पॉस मशीन बसविण्यात आल्या आहेत. त्यातून बायोमेट्रिक ओळख पटवून धान्याचे वितरण सुरू झाले. मात्र ही व्यवस्था कार्यान्वित होईपर्यंत ही यंत्रणा आपल्या गैरकारभाराच्या मुळावर येणार आहे याची जाणीव दुकानदारांना झाली नव्हती. त्यामुळे जानेवारीत ४३ टक्के तर फेब्रुवारीत ६१ टक्के व्यवहार या यंत्रणेमार्फत झाले.जालना, वाशिम, भंडारा, वर्धा, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, अकोला, सांगली, अहमदनगर, परभणी, नागपूर, लातूर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद येथे १०० टक्के धान्य वाटप आधारला लिंक करून झाले. त्यामुळे आपल्याला आता बोगस धान्य विकता येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर याविरुद्ध दुकानदारांचे आंदोलन सुरू झाले आहे, असे बापट म्हणाले.

टॅग्स :girish bapatगिरीष बापट