शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

दुबईकरांना भावली महाराष्ट्राची स्पेशल केळी! भारतानं केली तब्बल ६०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 5:51 PM

जगातील एकूण केळीच्या उत्पादनापैकी एकट्या भारतात २५ टक्के केळींचं उत्पादन होतं. गेल्या वर्षी भारतानं केळीच्या निर्यातीतून तब्बल ६०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल केली आहे.

जगातील एकूण केळीच्या उत्पादनापैकी एकट्या भारतात २५ टक्के केळींचं उत्पादन होतं. गेल्या वर्षी भारतानं केळीच्या निर्यातीतून तब्बल ६०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल केली आहे. पण यात महाराष्ट्रातील एका स्पेशल केळीनं दुबईकरांचं मन जिंकलं आहे. नुकतंच या स्पेशल केळीची एक खेप दुबईला रवाना झाली आहे. 

केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील केळींना जगभरात खूप मागणी आहे. याठिकाणी घेतली जाणारी स्पेशल केळीची एक खेप नुकतीच दुबईला रवाना झाली आहे. जळगावातील या केळीला GI Tag मिळालं आहे. या स्पेशल केळीची सध्या २२ मेट्रीक टन इतकी पहिली खेप दुबईला पाठविण्यात आली आहे. जळगावच्या तलवंडी गावातील शेतकऱ्यांकडून दुबईकरांनी केळी विकत घेतली आहे. देशाच्या कृषी क्षेत्रात महाराष्ट्रानं नेहमीच मोलाचं योगदान केलं आहे. जळगावनं ते आज पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे. 

जळगावच्या केळींमध्ये स्पेशल काय?महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील केळींमध्ये इतर केळींच्या तुलनेत अधिक फायबर आणि मिनिअलयुक्त असतात. याच खास गुणधर्मामुळे जळगावच्या केळींना २०१६ साली GI टॅग देण्यात आला होता. हा टॅग जळगाव जिल्ह्यातील निसर्गराज कृषी विज्ञान केंद्रासोबत नोंदणीकृत करण्यात आला आहे. 

देशानं केली ६०० कोटींची उलाढालगेल्या काही वर्षात जागतिक स्तरावर भारताच्या कृषी क्षेत्राच्या निर्यातीत वाढ झाल्याचा पाहायला मिळालं आहे. यात क्षमता आणि मूल्य या दोन्ही बाबतीत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. २०१८-१९ साली भारतानं एकूण १.३४ लाख टन इतकी केळी निर्यात केली आणि याची एकूण उलाढाल ४१३ कोटी रुपये इतकी होती. तर  २०१९-२० या वर्षात कोरोना महामारीमुळे निर्बंध असतानाच्या काळातही देशानं  १.९५ लाख टन केळींची निर्यात केली आणि तब्बल ६६० कोटी रुपयांची उलाढाल केली. तर २०२०-२१ या वर्षात हिच उलाढाल ६१९ कोटी रुपये इतकी झाली आहे. 

जगातील एकूण केळी उत्पादनापैकी २५ टक्के उत्पादन भारतातजगातील केळी उत्पादन देशांमध्ये भारताचं नाव अग्रस्थानी आहे. एकूण उत्पादनापैकी २५ टक्के उत्पादन हे एकट्या भारतात होतं. यात आंध्रप्रदेश, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात केळीचं उत्पादन होतं. 

काय असतो GI टॅग?जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजेच GI टॅग एखाद्या क्षेत्रातील विशेष उत्पादनाला बहाल केला जातो. जेणेकरुन संबंधित उप्तादनाची विशेष भौगोलिक ओळख यातून निश्चित होते. जसं की जळगावची केळी, दार्जिलिंगचा चहा, चंदरी साडी, सोलापूरची चादर, म्हैसूर सिल्क, भागलपुरी सिल्क आणि बिकानेरच्या भुजिया यांना GI टॅग प्राप्त झालेला आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावDubaiदुबईfruitsफळे