शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"स्थापनेपासून 'त्या' पक्षाला काही..."; उद्धव ठाकरेंचा मनसे प्रमुख राज ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 13:43 IST

ज्यांना पराभव जिव्हारी लागतो तोच उद्या इतिहास घडवू शकतो. आपल्याला उद्याचा इतिहास घडवायचा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

मुंबई - तुमच्यासारखे कार्यकर्ते मरमर मेहनत करतात, त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही. पराभव ज्यांच्या जिव्हारी लागतो तोच इतिहास घडवू शकतो. तुम्ही ज्या पक्षातून आलात त्याला ना हेतू आहे ना दिशा असं भाष्य करत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मनसे प्रमुख राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. घाटकोपर येथील मनसे कार्यकर्त्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. 

या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आहे एक है तो सेफ है..आता हाच प्रश्न मला मराठी माणसांना विचारायचा आहे. उद्याची मुंबई आपली राहणार आहे का? शहरात असे बरेच गृहनिर्माण प्रकल्प आहेत जिथे आपल्या हक्काची मुंबई डोळ्यादेखत ओरबडून नेली जातेय अशावेळी आपण षंढ म्हणून बघत बसणार का? तुम्ही कोणत्या पक्षातून आलात त्याबद्दल मला बोलायचं नाही पण पक्ष स्थापन केल्यापासून पक्षाला काही हेतू लागतो. दिशा लागते ती काहीच नाही. अशावेळी तुमच्यासारखे कार्यकर्ते तिथे मरमर मेहनत करतात. त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही असा निशाणा त्यांनी मनसेवर साधला. 

तसेच  १५ दिवसांपूर्वीच निकाल लागलाय, निकाल लागल्यानंतर तुम्ही शिवसेनेत येताय. जे जिंकलेत त्यांच्याकडे जल्लोष नाही तुम्ही इथं जल्लोषात प्रवेश करताय. जिंकलेल्यांना त्यांच्या विजयावर विश्वासच बसत नाही म्हणजेच त्या विजयात काहीतरी घपला आहे. बरेच घोटाळे आहेत. तुम्ही सगळे एकत्र आलात ते योग्य वेळी आला. जिंकल्यानंतर सगळे येतात पण हरल्यानंतर कुणी येत नाही. ज्यांना पराभवाची खंत असते. ज्यांना पराभव जिव्हारी लागतो तोच उद्या इतिहास घडवू शकतो. आपल्याला उद्याचा इतिहास घडवायचा आहे. आज तुम्ही सगळे शिवसेनेत आलात. मी शिवसेना एकच मानतो. शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाला दुसऱ्या कुणाला देण्याचा अधिकार नाही हे मी उघडपणे तेव्हाही सांगितले आजही सांगतोय. फक्त निशाणी बदललीय. निशाणी बदलल्यानंतरही आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरत होतो तेव्हा सर्वजण म्हणायचे उद्धवजी, तुम्हीच येणार. जे काही सर्व्हे सुरू होते त्यात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण होता, मग त्याची दांडी कशी उडाली असं उद्धव ठाकरेंनी विचारले. 

दरम्यान, हे सगळे चोरांचे, दरोडेखोरांचे राज्य आहे ते उलथावून टाकावेच लागेल. ठिणगी पडली आहे. आता तुम्हाला झोपून चालणार नाही कारण आता मुंबईतील मराठी माणसांचा, महाराष्ट्र धर्माचा आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि योग्यवेळी तुम्ही शिवसेनेची मशाल आणि भगवा हाती घेतला आहे. तुम्हाला जी काही मदत लागेल, जिथे आमदारांची मदत लागेल तुम्ही ताकदीने येऊन सांगा. तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाShiv Senaशिवसेना