निवडणुकांच्या कामाला लागा, गाफील राहू नका; उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 12:43 IST2022-11-24T12:42:51+5:302022-11-24T12:43:27+5:30

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, सध्याच्या सरकारने सोयीनुसार प्रभागाची रचना करून घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

Get to work on the elections, don't be heedless; Uddhav Thackeray's order to office bearers | निवडणुकांच्या कामाला लागा, गाफील राहू नका; उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

निवडणुकांच्या कामाला लागा, गाफील राहू नका; उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील २४ महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष अलर्ट झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना भवन येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत महापालिका निवडणुका कधीही जाहीर होतील, गाफील राहू नका, कामाला लागा. प्रभाग रचना काहीही करोत, आपल्याला जिंकण्यासाठीच मैदानात उतरायचे आहे, असे आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, सध्याच्या सरकारने सोयीनुसार प्रभागाची रचना करून घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे.  ते कोणत्या पद्धतीने प्रभाग तयार करतात, त्यांच्या राजकीय खेळी कशा चालतात यापेक्षा आपण जिंकण्यासाठी मैदानात उतरूया. मुंबई महापालिकेवर भगवाच फडकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे आतापासूनच आपल्याला कामाला लागण्याची गरज असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचीही तयारी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Web Title: Get to work on the elections, don't be heedless; Uddhav Thackeray's order to office bearers