शेअर बाजारासारखी लसणाचीही घसरगुंडी! ४०० वरून १०० वर; लाल मिरची ४० टक्क्यांनी घटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 05:15 IST2025-02-28T05:15:37+5:302025-02-28T05:15:51+5:30
राज्यातील ३०६ बाजार समित्यांच्या आवारातील बाजारात सध्या रोज ८ ते १० हजार टन लसणाची आवक सुरू आहे.

शेअर बाजारासारखी लसणाचीही घसरगुंडी! ४०० वरून १०० वर; लाल मिरची ४० टक्क्यांनी घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लसणाचा दर मागील दोन महिन्यांत ४०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला होता. मात्र, आता आवक वाढल्यामुळे आता दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलोवर आला आहे.
राज्यातील ३०६ बाजार समित्यांच्या आवारातील बाजारात सध्या रोज ८ ते १० हजार टन लसणाची आवक सुरू आहे. घाऊक बाजारात सध्या लसणाला प्रतवारीनुसार, प्रति क्विंटल ४,००० ते ९,००० रुपये असा दर मिळत आहे. किरकोळ बाजारात एक किलो लसणाची विक्री प्रतवारीनुसार, ८० ते १०० रुपये किलो दराने केली जात आहे.
देशात लसणाचे सर्वाधिक उत्पादन मध्यप्रदेशात घेतले जाते. सध्या बहुतांश लसणाची आवक मध्यप्रदेशातून होत आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून दर कमी झाले आहेत. किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलो दर मिळत आहे.
पुणे : नवीन हंगामातील मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्यात शीतगृहात साठा शिल्लक असल्यामुळे यंदा लाल मिरचीचे दर उतरले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत भाव ४० टक्क्यांनी कमी झाले.
लाल मिरचीचा हंगाम दरवर्षी १५ जानेवारीनंतर सुरू होतो, एप्रिलअखेरपर्यंत संपतो. बाजारात एकूण आवकच्या ५ ते १० टक्के मिरची राज्यातून येते. मात्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक येथून मार्केट यार्डात दररोज ६० ते ७० टन आवक होत आहे.
राजेश पोपटाणी, कांदा-बटाटा-लसूण व्यापारी, सांगली.
‘लवंगी’ घ्या की ‘काश्मिरी’ असे आहेत मिरचीचे दर !
प्रकार २०२४ २०२५
काश्मिरी ढब्बी ४००-६५० २८०-४००
ब्याडगी २५०-३०० १५०-२००
तेजा (लवंगी) १६०-२४० १४०-१७०
गुंटूर २००-२२० १३०-१६०
खुडवा गुंटूर ८०-११५ ५०-७०
खुडवा ब्याडगी ९०-११० ४०-९०