शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कचरा वेचणाऱ्यांचा होणार सन्मान

By admin | Updated: June 11, 2015 08:51 IST

देशात जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाटाची सक्षम यंत्रणाच अस्तित्वात नाही. मात्र उपेक्षित जीवन जगणाऱ्या गरीब कचरा वेचणाऱ्यांनी मात्र या कचऱ्याचे वर्गीकरण व विल्हेवाट

मुंबई : देशात जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाटाची सक्षम यंत्रणाच अस्तित्वात नाही. मात्र उपेक्षित जीवन जगणाऱ्या गरीब कचरा वेचणाऱ्यांनी मात्र या कचऱ्याचे वर्गीकरण व विल्हेवाट लावण्यात फार मोलाची भूमिका बजावली. त्यांचे कार्य अतुलनीय असून त्याची दखल घेत पुढील वर्षापासून कचरा वेचणाऱ्यांनाही सन्मान पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत जावडेकर बोलत होते. दररोज जमा होणाऱ्या १५ हजार टन कचऱ्यापैकी फक्त ९ हजार टन कचरा उचलला जातो. ही समस्या सोडविण्यासाठी कचरा विल्हेवाटीसाठी नवीन नियमावली तयार करण्यात येत असल्याचे जावडेकर यांनी या वेळी सांगितले. शहरी भागाप्रमाणेच ३ हजार व त्यापेक्षा अधिक लोकवस्तीच्या गावांनाही कचऱ्याच्या विल्हेवाटीचे नियम लागू करण्यात येणार आहेत, असे जावडेकर यांनी सांगितले. स्वच्छ भारत मोहीम यशस्वी करण्यासाठी जमा होणारा कचरा वेळेत उचलणे आवश्यक आहे. शिवाय या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि विल्हेवाट स्वच्छ भारतासाठी आवश्यक आहे, असे ते म्हणाले. पारंपरिक कचऱ्याच्या जोडीला ई-कचरा, प्लॅस्टिक कचराही मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे. कचऱ्याची जैविक, औद्योगिक, मेटल, बायोमेडिकल वेस्ट, ई-कचरा आदी प्रकारचे वर्गीकरण केले जाईल. नद्यांमध्ये यातील ८० टक्के कचरा प्रक्रिया न करता सोडला जातो. शिवाय २ हजार ३०० उद्योग त्यात भर घालतात. या उद्योगातून नदीत प्रदूषित पाणी सोडले जाणार नाही, याच्या तपासणीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. साखर व डिस्टिलरी उद्योगांना झीरो वॉटर डिस्चार्ज लागू करण्यात येणार आहे. त्यासाठीची यंत्रणा उभारणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचेही प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)