बियाणांच्या बाबतीत गुंजोटी गाव स्वयंपूर्ण

By Admin | Updated: June 19, 2017 01:30 IST2017-06-19T01:30:54+5:302017-06-19T01:30:54+5:30

शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळावी, शेतकऱ्यांना खात्रीचे व योग्य दरातील बी-बियाणे मिळावे यासाठी तालुक्यातील गुंजोटी येथे ५० शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन

Ganjoti village self-sufficient in case of seeds | बियाणांच्या बाबतीत गुंजोटी गाव स्वयंपूर्ण

बियाणांच्या बाबतीत गुंजोटी गाव स्वयंपूर्ण

मारुती कदम।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरगा (उस्मानाबाद) : शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळावी, शेतकऱ्यांना खात्रीचे व योग्य दरातील बी-बियाणे मिळावे यासाठी तालुक्यातील गुंजोटी येथे ५० शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन बिजोत्पादन प्रकल्प सुरू केला आहे. या वर्षातील खरीप व रब्बी पेरणीसाठी गावात तयार करण्यात आलेल्या प्रमाणित बियाणांची पेरणी करण्याचा निर्णय या गावातील शेतकऱ्यांनी घेतला आहे.
गाव शिवारातील भेसळयुक्त बियाणांपासून शेतकऱ्यांनी सुटका व्हावी, शेतकऱ्यांना गावातील तयार करण्यात आलेले बियाणे योग्य दराने उपलब्ध करून देता यावे यासाठी गावातील ५० शेतकऱ्यांनी
एकत्रित येऊन शासन मान्यताप्राप्त बिजोत्पादन प्रकल्पाची उभारणी केली आहे. या बिजोत्पादन प्रकल्पाची देखरेख करण्यासाठी तज्ज्ञ संचालक मंडळाची नेमणूक करण्यात आली आहे.शैलेश माळगे व प्रा. नागेश रामदासी यांनी यासाठी पुढाकार घेतला. संचालक मंडळातील प्रत्येकाने २० हजार रुपये वर्गणी जमा
केली आहे. अकराशे रुपये जमा
करून शेतकऱ्यांनी सदस्य नोंदणी केली आहे. या रकमेतून गावातील संतोष दूधभाते रमेश सूर्यवंशी, गणेश स्वामी या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी भाडेकरारावर घेऊन या मंडळाने बिजोत्पादनाचा प्रकल्प उभारला आहे. बिजोत्पादन प्रकल्पाला गुंजोटी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी असे नामकरण करण्यात आले आहे. तूर, सोयाबीन, हरभरा, गहू आदी बिजोत्पादन या शेतकरी बिजोत्पादकांकडून करणार असल्याची माहिती शैलेश माळगे यांनी दिली.

Web Title: Ganjoti village self-sufficient in case of seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.